Sleep Disorders: तुम्हाला रात्री झोप येत नाही का? मग हे काम करा

रोज रोज होणाऱ्या या त्रासाला Sleep Disorders म्हणतात. झोप न लागणं किंवा शांत झोप न येणं यामुऴे अनेक गंभीर समस्या उद्भवतात

Updated: Aug 7, 2021, 09:41 PM IST
Sleep Disorders: तुम्हाला रात्री झोप येत नाही का? मग हे काम करा title=

मुंबई: आरोग्य चांगलं आणि उत्तम राहावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतो. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आहार आणि झोप. या गोष्टी योग्य पद्धतीनं जर पार पडल्या नाहीत तर तुमचं आरोग्य नक्की बिघडणार हे ठरलेलं गणित आहे. त्यामुळे तुमची झोप योग्य वेळी आणि शरीराला आवश्यक तेवढी होणं गरजेचं आहे. पण काही लोकांना रात्री काही केल्या शांत झोप लागत नाही. त्यामुळे दिवसभर चिडचिड, थकवा येतो. 

रोज रोज होणाऱ्या या त्रासाला Sleep Disorders म्हणतात. झोप न लागणं किंवा शांत झोप न येणं यामुऴे अनेक गंभीर समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. त्यामुळे या आजारापासून सुटका मिळवायची असेल तर काही गोष्टी आपल्याला पाळणं बंधनकारक आहे. 

योग करा

योगा स्नायूंना आराम देऊन मन शांत ठेवतो. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर रोज 20 मिनिटे योग करा. तुम्हाला याचा फायदा मिळेल. योग करण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.

मेडिटेशन करा

दररोज 10 ते 20 मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आपला ताण कमी करण्यासाठी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. झोप चांगली आणि शांत लागण्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे.

व्यायाम करा

एका अभ्यासानुसार, जर तुम्ही दररोज 150 मिनिटे व्यायाम करत असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुमची रोजची कामाची कसरत देखील तुम्हाला निरोगी ठेवते आणि रात्री चांगली झोपही येते.

मंत्र किंवा जप करा

मंत्र आणि जप केल्यानं मानसिक ताण कमी होतो. यामुळे मन शांत राहते आणि रात्री चांगली झोप घेण्यास मदत होते. आपण ऊँकार केल्यास त्याचा फायदा जास्त होईल. त्यामुळे तुम्हाला शांत आणि प्रसन्न वाटेल.