मुंबई : लिपस्टिकमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडते. मात्र तुमच्या कपड्यांसोबतच चेहर्याच्या रंगानुसार त्याची निवड करणं आवश्यक आहे. अन्यथा लिपस्टिकचा चूकीचा रंग सारं काही बिघडवू शकते. मग पहा साधारण त्वचेनुसार लिपस्टिकचा रंग निवडताना कोणती काळजी घ्याल ?
तुमच्या त्वचेचा रंग उजळ आणि गोरा असल्यास लिपस्टिक पीच, न्यूड पिंक , वांगी रंगाची निवड करू शकता. तुम्ही मॅट स्वरूपाची लिपस्टिकदेखील निवडू शकता. गडद रंगाची लिपस्टिक असेल तर डोळ्यांचा मेकअप हलका असावा.
तुमच्या त्वचेचा रंग सावळा असल्यास गहर्या शेडच्या लिपस्टिक्स निवडा. लाल, नारंगी रंगाची लिपस्टिकही तुम्ही निवडू शकता. अशावेळे चेहर्याचा उजळपणा वाढवेल असा मेकअप करा.
त्वचेचा रंग न्युट्रल असल्यास, गहरा गुलाबी, वांगी, ब्राऊन लिपस्टिक लावा. मॅट लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांवर स्मोकी मेकअप केल्यास शियर ग्लॉसचा वापर करा.
क्लासिक न्यूड शेड ही गोर्या मुलींवर खुलून दिसते. न्यूड शेड ऑफिसला जाणार्या मुलींवर फार सुंदर दिसते. ऑफिसला जाणार्यांमध्ये न्यूड मेकअप लूक परफेक्ट आहे.
गुलाबी रंगाची लिपस्टिक अनेक मुलींना आवडते. गोर्या किंवा मिडियम रंगाच्या त्वचेच्या मुलींमध्ये गुलाबी रंग अधिक चांगला दिसतो.सावळ्या मुलींना तुलनेत गहर्या रंगातील शेड्स अधिक खुलून दिसतात.
लाल रंगाची लिपस्टिकदेखील एव्हरग्रीन आहे. ही लिपस्टिक कोणत्याही रंगाच्या त्वचेच्या मुलींवर खुलून दिसते.