How to control adult thoughts: वयात आलेल्या तरूण-तरूणींच्या शरिरात बदल होत असतात ( Physical changes in body) . ज्याप्रमाणे शरिरात बदल होत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या मनात ही वेगवेगळ्या भावना उत्पन्न होत असतात. भिन्नलिंगी आकर्षण वाढत असतं ( Attraction towards opposite sex) . किशोर वयातील मुला-मुलींना वर्गातील आपली मित्र-मैत्रिणीविषयी मनात आकर्षण वाटू लागतं. ती व्यक्ती आवडू लागते. या भावना इतक्या तीव्र असतात आणि तितक्याच मनाला सुखावणाऱ्याही असतात. आपल्या आवडीच्या व्यक्तीचा स्पर्श हवाहवासा वाटणं ( Much needed touch) . त्या व्यक्तीचा आवाज ऐकावासा वाटतो. एखाद्या व्यक्तीची जवळीक हवीहवीशी वाटते. कधी कधी भावना अनावर होतात. त्या व्यक्तीविषयी मनात एवढी ओढ असते की मन स्वप्न रंगवू लागतं. सोप्प्या भाषेत सांगायचं तर त्या व्यक्तीसोबत रॉमान्स करावा असं वाटू लागतं ( Feeling of romance) . मन फॅन्टसाईज करायला लागतं. स्वप्न रंगवणं इतकं आवडायला लागतं की बसं दुसरं काही सुचतच नाही. वर्गात शिक्षक शिकवत असताना शब्द कानावर पडतात पण डोक्यात जात नाहीत. कारण मनामध्ये विचारचं वादळ असतं. मन कुठेतरी प्रेयसीचा हात पकडून समुद्र किनारी बसलं असतं. आणि त्यापुढची सगळं स्वप्नं रंगवत असतं. शारिरीक संबंधाविषयी मन इतक्यात विचार करायला लागतं ( thoughts of physical thoughts) . तारूण्यात प्रवेश करताना हे सगळे विचार डोक्यात येणं हे अगदी सहज आहे. शरिर सुखाची कल्पना करणं किंवा शरीरसुखाची अपेक्षा असणं हे साहाजिक आहे. यामध्ये काहीच चुकीचं नाहीये किंवा अपराधी वाटण्यासारखं नाहीये.
माणसाच्या जन्मापासून त्याच्या शरीरात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स स्त्रवतात. हा सगळा खेळ मेंदूतून सुरु होतो. गोनाडोट्रॉपिन नावाचे हॉर्मोन्स हे मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीमध्ये स्रवतात. तिथून आणखी दोन प्रकारचे हॉर्मोन्स स्त्रवतात. ल्युटेनायझिंग(LH)आणि फॉलिकल स्टीम्युलीटिंग हॉर्मोन्स(FSH)हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळणारे हॉर्मोन्स आहेत जे स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. एफएसएच आणि एलएच अंडाशयांना इस्ट्रोजेन (estrogen hormone) तयार करण्यासाठी उत्तेजित करतात. हे हॉर्मोन्स तारुण्या दरम्यान आपल्या शरीरात बदल घडवून आणणारे आहे. हे बदल शरीराला गर्भधारणेसाठी तयार करतात आणि त्यामुळे मासिक पाळीला सुरुवात होते. तर पुरुषांच्या शरिरात एफएसएच आणि एलएचमुळे टेस्टोस्टेरॉन (testosterone hormone) हॉर्मोन्स तयार होते. हे अंडकोषाच्या आत घडते, जिथे शुक्राणू पेशी देखील तयार होतात. पुरुषांच्या प्रजननासाठी शुक्राणू पेशी आवश्यक असतात. हार्मोन्सच्या या वाढीचा मुख्यतः तुमच्या लैंगिक अवयवांवर परिणाम होतो, परंतु तारुण्यकाळात इतर अनेक गोष्टी बदलतात. उंच वाढते, संपूर्ण शरीराची वाढ होते. मुरुमं येऊ शकतात. मनात शरिर संबंधाविषयी विचार येतात. हे जितकं सहज आहे तितकं नैसर्गिक आहे. हा विचार सतत मनात येणारे तुम्ही एकटेच नाही किंवा त्यामुळे तुम्हाला अपराधी वाटण्याचं कारण नाही.
- मन एखाद्या शारिरीक किंवा कलात्मक गोष्टीकडे केंद्रीत करा ( Focus on art) . अशा गोष्टी करा की ज्यामध्ये तुम्हाला मन एकाग्र होणं गरजेचं असेल. जेणेकरून तुमच्या मनातून हे विचार निघून जातील.
- व्यायाम, योगा करा आणि स्पोर्ट्समध्ये ( Excersise and Yoga) आवड असल्यास नियमित स्पोर्ट्स खेळा.
- स्वत:ला कामात, अभ्यासात गुंतवा.
- एखाद्या वडिलधाऱ्या मित्र आणि मैत्रिणाचा सल्ला घ्या, मोकळेपणाने बोलून आपल्या शंकाचं निरसन करून घ्या.