कोरोना व्हायरस स्वतःमध्येच कसा करतो बदल?

जगासाठी कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रोन व्हेरिएंट, चिंतेचं कारण बनलं आहे.

Updated: Dec 2, 2021, 02:32 PM IST
कोरोना व्हायरस स्वतःमध्येच कसा करतो बदल? title=

मुंबई : यावेळी, जगासाठी कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रोन व्हेरिएंट, चिंतेचं कारण बनलं आहे. याआधीही कोरोनाचे काही धोकादायक व्हेरिएंट समोर आले आहेत. व्हायरसमध्ये होत असलेल्या बदलांमुळे हे घडतंय आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, व्हायरस स्वतःमध्ये कसा बदल करतो आणि हे नवीन व्हेरिएंच कसे दिसतात.

ऑल इंडिया सेंटर ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीच्या क्रिटिकल केअर विभागाचे युधवीर सिंग यांनी सांगितलं की, जेव्हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो तेव्हा त्याची गुणाकार करण्याची क्षमता सुधारते. 

व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढते. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांच्यामध्ये विषाणू वाढू लागतो आणि स्वतःला मजबूत बनवतो आणि त्याचे मूळ स्वरूप बदलतो. मग हा नवा फॉर्म मुख्य विषाणू बनतो आणि इतर लोकांमध्ये पसरू लागतो. 

जीनोम सिक्वेन्सिंग दाखवतं की, व्हायरसने स्वतःमध्ये बदल केला आहे आणि तो नवीन प्रकारांमध्ये बदलला आहे. 

व्हायरस असा बदलला

डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा वुहानमधून उद्भवलेल्या SARS-Cov 2 नंतर D614 झाला. त्यानंतर या व्हेरिएंटमध्ये बरेच बदल झाले. ज्यांना अल्फा, डेल्टा, बीटा, गामा, लॅम्बडा, एमयू अशी नावं देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेत, व्हायरसने त्याचं स्वरूप बदललं, ज्याला ओमायक्रोन असं नाव देण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सर्व प्रकारांची दोन प्रकारे व्याख्या केली आहे. त्यांना ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ आणि ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्‍ट’ असं म्हणतात. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉन यांना ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ मध्ये ठेवलं आहे. त्याच वेळी, Lambda आणि MU सारख्या प्रकारांना ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्‍ट’ म्हटलं गेलं आहे.