कोबी आवडीने खात असाल तर थांबा, यापद्धतीनं खाणं शरीरासाठी हानिकारक

कारण या भाजीचा वापर करताना एखादी छोटीशी चूक झाली तर ती तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Updated: Nov 30, 2021, 05:37 PM IST
कोबी आवडीने खात असाल तर थांबा, यापद्धतीनं खाणं शरीरासाठी हानिकारक title=

मुंबई : कोबीही हिवाळ्यात येणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. परंतु तुम्हाला तशी ही भाजी सगळ्या ऋतूमध्ये पाहायला मिळते, पण कोबीच्या भाजीला खरी चव थंडीच्या मोसमातच येते. कोबीचा वापर लोक जंक फूड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. याव्यतिरीक्त त्याचा वापर कोशिंबीर आणि भाजीसाठी ही केला जातो. परंतु जी भाजी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगली मानली जाते, ती भाजी तुमच्या शरीरीचे नुकसान देखील करु शकते.

कारण या भाजीचा वापर करताना एखादी छोटीशी चूक झाली तर ती तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ती चूक काय आहे आणि ती कशी टाळायची याबद्दल जाणून घ्या.

कोबीच्या पानांमध्ये कीटक लपलेले असतात

ही गोष्ट तुम्ही बर्‍याच लोकांकडून ऐकली असेल आणि अनेक ठिकाणी वाचली असेल की कोबीच्या पानांच्या थरांमध्ये कीटक लपलेले असतात. हे कीटक इतके लहान असतात की, ते आपल्याला उघड्या डोळ्यांनीही दिसत नाहीत. हे कीटक एक प्रकारचे परजीवी आहेत. म्हणजेच ते इतरांच्या शरीरातही जिवंत राहू शकतात. या किटकांना टेपवार्म्स म्हणतात.

कोबी नीट धुवून शिजवून न खाल्ल्याने हे परजीवी शरीरात प्रवेश करतात. जेव्हा हा टेपवार्म शरीरात पोहोचतो तेव्हा त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागते. ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये देखील प्रवेश करतात. ज्याद्वारे रक्त शरीराच्या इतर भागांमध्ये आणि तुमच्या मेंदूमध्येही प्रवेश करते. ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.

टेपवर्म शरीरात येण्यापासून कसे रोखायचे

जर तुम्हाला टेपवर्म शरीरात येण्यापासून रोखायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही कोबी नीट धुवून शिजवून घेणे महत्त्वाचे आहे.

कोबी बनवण्यापूर्वी अशा प्रकारे स्वच्छ करा

कोबी बनवण्यापूर्वी त्याचे वरचे थर काढून टाका. त्यानंतर ते पाण्याने चांगले धुवावेत. यानंतर, कोबी चिरून घ्या आणि नंतर पाण्याने धुवा. कोबी कापून पाण्याने धुतल्यानंतर, शिजवण्यापूर्वी सुमारे 15 ते 20 मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा. जेव्हा तुम्ही भाजी बनवणार असाल तेव्हा हे करा. यानंतरही, आपण इच्छित असल्यास, आपण कोबी पाण्याने धुवू शकता. काही लोक कोबी कापून पाण्याने धुतल्यानंतर काही वेळ गरम पाण्यात ठेवून उकळतात आणि नंतर चाळणीत ठेवतात म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाते. आपण हे देखील करू शकता.