पोर्ट ब्लेअर : ओमायक्रनने चिंता वाढवली असताना संपूर्ण देशातून एक चांगली आणि मोठी बातमी आहे. अंदमान निकोबार बेटांवर 100% लसीकरण पूर्ण झालं आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये.
अंदमान आणि निकोबार बेटांवर 16 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली. सर्वप्रथम, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा डोस देण्यात आला.
विशेष म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये लसीकरण पूर्ण करणे हे मोठं आव्हान होतं. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 836 आईलँड आहेत, जी उत्तरेकडून दक्षिणेकडे 800 किमी पसरलेली आहेत. समुद्र, खूप घनदाट जंगले आणि टेकड्या आहेत. या ठिकाणचं हवामान अनेकदा खराब असतं.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील 87 टक्के प्रौढांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे. त्याच वेळी, 56 टक्क्यांहून अधिक लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल पॅनलने अंदाज वर्तवला आहे की, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता. Omicron मुळे कोविड-19 ची तिसरी लाट भारतात येणार आहे. Omicron प्रकार लवकरच डेल्टा प्रकाराची जागा घेईल.