Good News: Cervical कँसरवर पहिली स्वदेशी व्हॅक्सिन उद्या लाँच होणार, काय आहे खास वाचा

सर्वाइकल कँसर विरुद्धच्या लढाईत भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. उद्या पहली स्वदेशी व्हॅक्सिन लाँच केली जाणार आहे. 

Updated: Aug 31, 2022, 06:44 PM IST
Good News: Cervical कँसरवर पहिली स्वदेशी व्हॅक्सिन उद्या लाँच होणार, काय आहे खास वाचा title=

Cervical Cancer Vaccine Launch Tommorow: सर्वाइकल कँसर विरुद्धच्या लढाईत भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. उद्या पहली स्वदेशी व्हॅक्सिन लाँच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नोलॉजी विभाग 1 सप्टेंबर 2022 रोजी ही व्हॅक्सिन लाँच करणार आहे. सर्वाइकल कँसर हा स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुखावर होणार आजार आहे. भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कँसरचे प्रमाण वाढले आहे. एका अहवालानुसार, 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये या कँसरचे प्रमाण सर्वाधिक आहे.  त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील कँसरची समस्या कमी करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरू शकते.

कँसर योनी, मूत्राशयस गुदाशयापासून फुफ्फुसात पसरतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) जो लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी हा विषाणू सर्वाधिक जबाबदार असतो. ही लस लाँच केल्यानंतर पहिल्यांदा 9 ते 14 वर्षांच्या मुलींना दिली जाणार आहे. "ही लस खूप प्रभावी आहे आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधित करते. कारण, 85 टक्के ते 90 टक्के प्रकरणांमध्ये, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या विशिष्ट विषाणूमुळे होतो आणि ही लस त्या विषाणूंविरूद्ध काम आहे. ही लस लहान मुलांना आणि मुलींना दिली तर त्यांचं संसर्गापासून संरक्षण होईल. परिणामी कदाचित 30 वर्षांनंतर कँसर होणार नाही,” डॉ अरोरा यांनी सांगितलं.

 

शात सध्या दोन एचपीव्ही लसी आहेत. या लस विदेशी कंपन्यांनी तयार केल्या आहेत. यापैकी एक लस गार्डासिल आहे, जी मर्कने उत्पादित केली आहे. तर दुसरी सर्व्हरिक्स लस असून, जी ग्लॅक्सोस्मिथक्लाइनने तयार केली आहे. बाजारात एचपीव्ही लसीची किंमत सुमारे 2,000 ते 3,000 रुपये प्रति डोस आहे. सीरम या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे किमती कमी होतील अशी आशा आहे.