कोरोनाची लागण झाल्याची शंका असेल, तर सर्वात आधी हे काम करा!

कोरोना रुग्णसंख्या ही आता झपाट्याने वाढत आहे.

Updated: Jan 15, 2022, 03:13 PM IST
कोरोनाची लागण झाल्याची शंका असेल, तर सर्वात आधी हे काम करा! title=

मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार पुन्हा एकदा सर्वत्र हाहाकार माजवत आहे. कोरोना रुग्णसंख्या ही आता झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, जर आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असतील किंवा आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय येत असेल, तर आपण ताबडतोब काही उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही वेळीच या सगळ्याचा सामना करु शकता.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

सर्वप्रथम, जर तुम्हाला थोडीशीही शंका असेल की तुम्ही कोरोनाच्या विळख्यात आला आहात, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे. जेणेकरून या संसर्गाची वेळीच तपासणी करता येईल. कोरोनाची अचूक ओळख होण्यासाठी त्याची चाचणी होणे आवश्यक आहे.

स्वतःला वेगळं ठेवा

दुसरीकडे, ताबडतोब स्वत:ला अलग करा. कारण कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य विषाणू आहे. असे मानले जाते की, जर बाधित व्यक्ती तोंडावर रुमाल न ठेवता शिंकत असेल तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल.

संसर्ग झाल्याची बाब लपवू नका

याशिवाय, जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर तुम्ही ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून अजिबात लपवू नये. कारण असे केल्याने तुमच्या संपर्कात आलेले लोकही अडचणीत येऊ शकतात. त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला द्या. बर्‍याच वेळा, बहुतेक प्रकरणांमध्ये, कोरोना संक्रमित व्यक्तीला ताप, खोकला, थकवा आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत ही लक्षणे अनेक प्रकरणांमध्ये वाढतात. वेळीच काळजी घेऊन ही लक्षणे नियंत्रित करता येतात.

आराम करा

जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल, तर अशा परिस्थितीत अजिबात काम करू नका. कारण अशा संसर्गामुळे तुमच्या शरीरात अशक्तपणा येईल, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी लागेल. तसेच अधिकाधिक हिरव्या भाज्यांचे सेवन करावे लागेल. हे तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करेल.

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

जेव्हा तुम्हाला संसर्गाची लक्षणे जाणवू लागतात तेव्हा तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवावे लागेल. यामुळे तुमच्या शरीरात संतुलन राहते आणि तुमचे शरीर संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. वेळोवेळी पाणी पित राहा, ज्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहील. शक्य असल्यास, आपण आपल्या आहारात रसवाल्या पदार्थांचा देखील समाविष्ट करू शकता. म्हणजेच, कोरोनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.