चटपटीत फणसाचे कबाब

उन्हाळयात मिळणाऱ्या अनेक फळांपैकी एक पौष्टीक फळ म्हणजे फणस. 

Updated: Mar 29, 2018, 10:42 PM IST
चटपटीत फणसाचे कबाब  title=

 मुंबई : उन्हाळयात मिळणाऱ्या अनेक फळांपैकी एक पौष्टीक फळ म्हणजे फणस. तो कापून त्यातील गरे काढणे हे अत्यंत किचकट काम असले तरी त्याच्या गऱ्यात मधुरता असते. आपण गरे नुसते खाऊ शकतो. किंवा फणसाची भाजी करू शकतो. तसंच त्याच्या बिया/ आठळ्या भाजीत घालून किंवा उकडून नुसत्या खाऊ शकतो. पण फणसाचे कटलेट ही डिश कशी वाटतेय ? हे कटलेट तुम्ही बर्गर मध्ये वापरू शकता, चटणी सोबत खाऊ शकता किंवा अगदी वरण भाताबरोबर देखील तोंडी लावण्यासाठी हा मस्त पर्याय आहे. कबाब म्हणताच त्याचा सुगंध, स्वाद अगदी मनात भरतो. म्हणून यंदा हे फणसाचे कबाब नक्की बनवून बघा. 

साहित्य:

कच्च्या फणसाचे गरे- ५०० ग्रॅम
कांद्याची पेस्ट- १ कप
बारीक चिरलेला कांदा- १/२ कप
कच्च्या पपईची पेस्ट- २ चमचे
कबाब मसाला- २ चमचे
मीठ आणि लाल मिरची पावडर- चवीनुसार
गरम मसाला आणि जिरं पावडर- चिमूटभर
कसुरी मेथी- १ चमचा
क्रश केलेल्या लाल मिरच्या- २ चमचे
चाट मसाला- २ चमचे
ब्रेड क्रॅम्स
तेल (शॅलो फ्राय करण्यासाठी)

कृती:

फणसाचे गर मऊ, मॅश होण्यासारखे होईपर्यंत उकळवा.
त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि फोर्कने मॅश करा. त्यात एकही गुठळी राहणार नाही, असे पहा.
मॅश करून झाल्यावर त्यात तेलव्यतिरिक्त इतर पदार्थ म्हणजेच कांद्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, पपईची पेस्ट, कबाब मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरं पावडर, कसुरी मेथी, क्रश केलेल्या लाल मिरच्या आणि चाट मसाला घाला व व्यवस्थित मिक्स करा.
मिश्रणाचे १८-२० समान भाग करा. आणि त्याचे गोळे तयार करून हाताने दाबून फ्लॅट करा. हे गोळे तयार करताना हाताला थोडंस तेल लावा. म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. 
त्यानंतर कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या.
पॅन थोडा गरम झाल्यावर त्यात थोडं तेल घाला आणि तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यावर कटलेट ठेवा.
कटलेट दोन्ही बाजूने ब्राऊनीश होईपर्यंत नीट फ्राय करा.
किंवा तुम्ही कटलेट ग्रील देखील करू शकता.