जस्टिन बीबरला झालेला दुर्मीळ आजार Ramsay Hunt Syndrome नक्की काय?

रामसे हंट सिंड्रोम या आजाराची लक्षणं काय? कशामुळे होतो हा आजार काय काळजी घ्यावी?

Updated: Jun 11, 2022, 10:21 AM IST
जस्टिन बीबरला झालेला दुर्मीळ आजार Ramsay Hunt Syndrome नक्की काय?  title=

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरला गंभीर आजाराने ग्रासलं आहे. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याला एक भाग अधू झाला आहे. त्याचा भारत दौराही रद्द होऊ शकतो. त्याच्या या गंभीर आजाराचं नाव आहे Ramsay Hunt Syndrome. हा आजार नेमका काय? त्याची लक्षणं कोणत्या याबद्दल जाणून घेऊया. 

हा एक असा व्हायरस आहे जो मेंदूमधील नसेवर अॅटॅक करतो. त्यामुळे अर्धांगवायू होण्याचा धोका असतो. या आजारामुळे चेहरा आणि तोंडावर पुरळं देखील उठतात. Varicella zoster नावाचा एक विषाणू मेंदूतील मज्जातंतूला संक्रमित करतो. तेव्हा हा आजारा होतो असं अभ्यासातून समोर आलं आहे. 

या व्हायरसच्या संक्रमणामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. कांजण्यांमधूनही हा व्हायरस शरीरात पसरण्याचा धोका असतो. कांजण्यातून बरं झाल्यानंतर नसांमध्ये हा विषाणू राहू शकतो आणि तो पुन्हा सक्रिय देखील होऊ शकतो असं सांगितलं जातं. 

या आजाराच्या लक्षणांमध्ये तोंडात आणि डोळ्यांमध्ये ड्रायनेस जाणवतो. कान दुखणं, चक्कर येणं एक बाजू अधू होणं यासारखी लक्षणं दिसून येतात. चेहऱ्याचे हावभाव बदलतात. एक बाजू जड होते आणि अर्धांगवायूचा चेहऱ्याला त्रास होतो. 

सिंगर जस्टिन बीबरचा चाहत्यांना मोठा धक्का, गंभीर आजाराशी झुंज; चाहते चिंतेत

हा आजार साधारण चिकनपॉक्स सारखा आजार दुसऱ्यांदा उद्भवल्यानंतर होण्याचा धोका अधिक असतो. या आजाराचा वृद्धांना धोका जास्त आहे. तरुण आणि मुलांमध्ये ह्या आजाराचं प्रमाण कमी असल्याचंही सांगितलं जातं. हा अत्यंत दुर्मीळ आजार आहे.