Kitchen Hacks: पावसाळ्यात अन्नाला बुरशी लागण्याची भिती? 'हे' घरगुती जुगाड करा आणि राहा टेंशन फ्री

Kitchen Hacks for Food Safety in Monsoon: पावसाळ्यात अन्न खराब होण्याची अनेकदा चिंता लागून राहिलेली असते तेव्हा आपल्याला याबद्दल काळजी घेणे गरजेचे असते. तेव्हा चला तर मग पाहुया की तुम्ही अशावेळी कोणत्या सोप्प्या गोष्टी करू शकता. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 4, 2023, 08:45 PM IST
Kitchen Hacks: पावसाळ्यात अन्नाला बुरशी लागण्याची भिती? 'हे' घरगुती जुगाड करा आणि राहा टेंशन फ्री title=
July 4, 2023 | kitchen hacks how to preserve food in rainy season know the easy steps

Kitchen Hacks for Food Safety in Monsoon: सध्या पावसाळ्याचा मौसम आहे तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वयंपाक घर. आपलं जेवण हे अधिक सुरक्षित राहण्यासाठी आपण कायमच प्रयत्न करताना दिसतो. पावसळ्यात अधिकवेळा आपलं अन्न हे खराब होतं. तेव्हा त्यासाठी आपल्याला फक्त फ्रीज किंवा अन्न साठवण्यासाठी आपल्याला अनेक तऱ्हेच्या उपाययोजना या कराव्या लागतात. अन्नाला अनेकदा वास येतो किंवा ते अन्न हे फूकटही जातं. त्यामुळे आपलं अन्न हे उगाचच वाया जातं. त्यातून कधीच जास्त पदार्थ करावे लागले तर आपल्याला त्या अन्नाची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात आपलं अन्न खराब होऊ नये म्हणून तुम्ही घरगुती आणि सोप्प्या उपाययोजना करू शकता. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही नक्की कोणत्या उपाययोजना करू शकता. 

पावसाळ्यात आपल्या खोलीत मॉश्चराईझर जास्त असते. त्यामुळे अन्नाची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातून बुरशी आणि बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूंचा अशावेळी अधिक धोका असतो. चला तर मग जाणून घेऊया महिलांना स्वयंपाकघरात या काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात ज्यानं तुम्हाला कसली फिकीर राहणार नाही. 

अशी घ्या काळजी 

1. तुम्हाला तुमचं जेवण हे अधिक काळजीपुर्वक साठवून ठेवणं गरजेचे असते. मुळात जेव्हा खासकरून तुम्ही पालेभाज्या किंवा फळं विकत घ्याल तेव्हा तुम्हाला ती खरेदी करतानाच त्या सर्व गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक राहील म्हणजेच विकत घेतानाच ती फ्रेश आहेत ना याची काळजी घ्या. 

2. तुम्हाला जर का एखादी गोष्ट ही दीर्घकाळ साठवून ठेवायची असेल तर तुम्हाला तुम्ही जिथून तुमच्या खाण्यापिण्याची गोष्टी विकत घेत आहात त्या आधीच ताज्या आहेत ना याची खात्री करून घ्या. 

3. दुग्धजन्य पदार्थ 0 ते 5 अंश तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. त्यामुळे तुम्हाला बॅक्टेरियाचा त्रास होऊ शकणार नाही. 

ओलसर ठिकाणी अन्न ठेवू नका 

  • पाण्यात अन्न जास्त साठवून ठेवू नका कारण त्याचा तुमच्या अन्नावर परिणाम होऊ शकतो अशावेळी यातून बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. 

असं साठवा अन्न

  • अन्न फ्रीजमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. परंतु अनेकदा हे अन्न फ्रीजमध्ये ठेवूनही खराब होते. परंतु अशावेळी तुम्ही अन्न हे काचेच्या बरणीत ठेवू शकता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)