Measles : गोवरचं थैमान! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

बुधवारी म्हणजेच आज अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. 

Updated: Nov 23, 2022, 09:24 PM IST
Measles : गोवरचं थैमान! 8 महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू title=

Measles Outbreak : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत गोवरची (Measles) साथ पसरल्यांच दिसतंय. तर बुधवारी म्हणजेच आज अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. गोवरमुळे 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत. लहान मुलांमध्ये याचं प्रमाण अधिक दिसून येतंय. 

गोवरचं थैमान (Measles Outbreak)

राज्यात गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती हाती आली आहे. भिवंडीतील 8 महिन्यांच्या बालकाचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू झालाय. 

गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांचं (measles child) आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे तुमच्या लहानग्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (vaccine) आणि काळजी घ्या, असं आवाहन देखील करण्यात आलंय.

6 महिन्यांच्या बालकांना लस देण्याबाबत विचार

महाराष्ट्रात गोवर साथीच्या (Measles) आजाराने थैमान घातलंय. लहान मुलांनाही मोठ्याप्रमाणात या आजाराची लागण होताना दिसतोय. यामध्ये मुंबईनंतर (Mumbai) ठाण्यातील भिवंडीमध्ये गोवर, रुबेला आजाराने कहर केलाय. गोवरच्या साथीचं गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात एक बैठक बोलवाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माहिती दिली की, या बैठकीत एक बालक दुसऱ्यांच्या संपर्कात येतायत का ते पाहतोय. ज्या ठिकाणी लसीकरण झालं नसेल तिथे ते करणं गरजेचं आहे. बालकांना लस देण्याचं काम सुरू आहे. 6 महिन्याच्या बालकांना लस देता येईल याचा विचार सुरू आहे. यावर एक्सपर्ट कमिटी अभ्यास करतेय. ही समितीच याबाबत निर्णय देईल. शिवाय याबाबत जागरूकता होणं गरजेचं आहे."

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, "गोवरसंदर्भात अनेक ठिकाणी लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे सध्या हे वाढवणं गरजेचं आहे. 84 टक्के लसीकरण काही ठिकाणी झालंय. काही राज्यात 60 टक्के लसीकरण झालं आहे."

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x