Milk for Weight loss: चर्बी घटवण्यासाठी हे दूध नक्की प्या!

दुधाचे प्रकार जाणून घ्या, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

Updated: Jul 23, 2021, 03:08 PM IST
Milk for Weight loss: चर्बी घटवण्यासाठी हे दूध नक्की प्या! title=

मुंबई : पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामासह योग्य आहाराची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या आहारात वजन कमी करण्यास मदत करणार्‍या गोष्टींचा समावेश केल्यास वजन लवकर कमी होऊ शकतं. तर आज आम्ही तुम्हाला अशा दुधाबद्दल सांगणार आहोत, जे शरीराचं वजन कमी करण्यात मदत करेल आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करेल. चला, दुधाचे प्रकार जाणून घ्या, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी कोणतं दूध प्यावं?

गाय किंवा म्हशीच्या दुधाचं सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. सल्लागार आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह म्हणतात की, दुधात हाडांसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियम, व्हिटॅमिन डी इत्यादी पोषक घटक असतात. परंतु त्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे ते वजन कमी करण्यास अडथळा आणू शकतं. 

परंतु आम्ही म्हशी किंवा गाईच्या दुधाऐवजी इतर प्रकारचे दूध घेऊ शकता. ज्यामध्ये चरबी कमी होईल आणि वजन कमी करण्यास देखील मदत करेल.

नारळाचं दूध 

जर आपण चांगल्या दुधाचा पर्याय शोधत असाल तर नारळाचे दुधाचे काम होईल. नारळाच्या पांढर्‍या भागापासून नारळाचं दूध काढलं जातं. गाईच्या दुधाच्या तुलनेत यामध्ये कॅलरी कमी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात ते गाईच्या दुधापेक्षा चांगलं मानलं जातं.

सोया मिल्क

तुम्हाला लॅक्टोजची एलर्जी असेल तर सोया दूध निवडणं योग्य आहे. कारण, सोया दुधात ग्लूटेन, लॅक्टोज आणि कोलेस्टेरॉल नसतं. या व्यतिरिक्त त्यातील कॅलरीचे प्रमाणही गाईच्या दुधापेक्षा कमी आहे. ज्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी सोया दुधाचं सेवन करू शकता.

बदामाचं दूध

जर तुम्हाला दुधात कमी प्रमाणात चरबीयुक्त प्रथिनं मिळवायची असतील तर तुम्ही बदामाचं दूध पिऊ शकता. बदामांच्या दुधात व्हिटॅमिन इ आणि प्रथिनं भरपूर असतात. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तुम्ही बदामांचं दूध पिऊ शकता.