दातांचं आरोग्य राखताना तुमच्याकडून हमखास होत असतील 'या' चुका

अनेकदा दररोजच्या सवयींमुळे तोंडाची स्वच्छ ठेवताना अनेक चुका करतात.

Updated: Jul 29, 2021, 09:41 AM IST
दातांचं आरोग्य राखताना तुमच्याकडून हमखास होत असतील 'या' चुका

मुंबई : अनेक लोकं तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. तर काही जणं भीतीमुळे डेसिंस्टकडे जाण्याचंही टाळतात. इतकंच नाही तर रोज नियमितपणे दात घासून देखील लोकांना दातांच्या समस्या उद्भवताना दिसतात. दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, लोकं अनेकदा त्यांच्या दररोजच्या सवयींमुळे तोंडाची स्वच्छ ठेवताना अनेक चुका करतात. यामुळे तोंडाचं तसंच दाताचं आरोग्य धोक्यात येतं.

जाणून घेऊया दातांचं आरोग्य राखताना आपण कोणत्या चुका करतो

योग्य ब्रश न वापरणं

लोकांनामध्ये एक समज मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तो म्हणजे मध्यम आणि हार्ड पद्धतीच्या ब्रशने दात उत्तम पद्धतीने साफ होतात. मात्र दीर्घकाळ याचा अशा वापर नुकसानदायक ठरू शकतो. त्यामुळे ब्रश निवडताना योग्य पद्धतीने निवडा.

अँटी सेंसेटीव्हीटी आणि व्हायटनिंग टूथपेस्टचा सतत वापर

अँटी सेंसेटीव्हीटी आणि व्हायटनिंग टूथपेस्टचा दीर्घकाळ वापर करण्याची चूक अनेकजण करतात. अशा प्रकरच्या टूथपेस्ट निवडताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. अशा प्रकारच्या टूथपेस्ट काही काळ वापरणं ठीक आहे. मात्र दीर्घकाळ वापरणं दातांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.

दात घासण्याची पद्धत

दात घासताना आपला ब्रश हा नेहमी उभा धरावा. असे केल्याने दात योग्यप्रकारे स्वच्छ होतात. दात घासताना आपला ब्रश हिरड्यांपासून 45 अंशाच्या कोनात धरून दातांवर वर-खाली अशा दिशेने फिरवावा. 

अधिक जोर देऊन ब्रश करण्यासाठी सवय 

दात स्वच्छ करताना अधिक जोर देऊन ब्रश केल्याने आपल्या दातांचं आरोग्य सुधारत नाही. त्याऐवजी, जोर लावून दात घासल्याने आपलं टूथ इनॅमल आणि आपल्या हिरड्यांच्या टिश्यूचं नुकसान होऊ शकतं.

खूप कमी तसंच जास्त काळ ब्रश करणं

दातांची स्वच्छता दिवसातून किती वेळा आणि किती वेळ करावी, याबद्दल लोकांमध्ये गोंधळ उडालेला दिसतो. जर तुम्ही देखील या गोंधळात असाल तर दिवसातून 2- 3 वेळा आपले दात स्वच्छ केले पाहिजे. त्याचप्रमाणे कधीही 2-3 मिनिटांपेक्षा जास्त ब्रश करू नका.