वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे करत नाही ना? नाहीतर तुम्हाला हे महागात पडू शकते

अभ्यासानुसार रुग्णालयात यकृताच्या समस्येमुळे दाखल झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Updated: Jul 28, 2021, 09:51 PM IST
वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे करत नाही ना? नाहीतर तुम्हाला हे महागात पडू शकते title=

मुंबई : आजकाल मुलांमध्ये वजन वाढवणे आणि मुलींमध्ये वजन कमी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहेत. सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करण्याकडे वळतात. परंतु चुकीच्या मार्गाने वजन कमी करणे तुम्हाला धोकादायक ठरु शकते. त्यामुळे तुम्हा योग्य ती माहिती घेऊनच पुढे जा. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी हर्बल आणि डायट्री सप्लीमेंट घेत असल्यास काळजी घ्या. एका अभ्यासानुसार यामुळे तुमचे यकृत खराब होऊ शकते आणि तुम्हाला इतरही अनेक समस्या येऊ शकतात.

डायट्री आणि हर्बल सप्लीमेंटचा वापर

वास्तविक, यकृत खराब होण्यामागे पुष्कळ कारणे असू शकतात. त्यामागचे एक मोठे कारण आहे डायट्री आणि हर्बल सप्लींमेंट (Herbal Supplement) वापर हे एक प्रमुख कारण आहे.

बाजारात स्नायूंच्या वाढीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे हर्बल आणि  डायट्री सप्लीमेंट आहार उपलब्ध आहेत, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की, त्याचा त्यांच्या यकृतावर कसा परिणाम होईल.

यकृत नुकसान होण्याचे कारण

ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार यकृत खराब होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे आपण डायट्री सप्लीमेंट, याच्या अधिक वापर केल्याने यकृत खराब होण्याचा धोका वाढतो.

रॉयल प्रिन्स अल्फ्रेड हॉस्पिटलच्या डॉ एमिली नॅश यांनी 2009  ते 2020 दरम्यान एक अभ्यास केला. या अभ्यासामध्ये, त्यांनी एडब्ल्यू मोरो गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि यकृत केंद्रात औषधोपचार-यकृत इजा झालेल्या 184 लोकांच्या रेकॉर्डस तपासले. त्यावेळी त्यांना आढळले की, यकृत खराब होण्याऱ्या लोकांपैकी बरेच लोकं डायट्री आणि हर्बल सप्लीमेंट घेत होती.

अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे

अभ्यासानुसार रुग्णालयात यकृताच्या समस्येमुळे दाखल झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2009 and ते 2011 या कालावधीत 11 पैकी 2 रुग्णांना यकृत-संबंधित आजारांमध्ये दाखल केले गेले. ही संख्या 15 टक्के होती, जी 2018 ते 2020 दरम्यान वाढून 47 टक्के झाली आहे. 2018 आणि 2020 दरम्यान 19 पैकी 10 रुग्णांनाना या समस्येचा त्रास होता.

संशोधकांना असे आढळले की, ताप आणि वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामोल आणि अँटीबायोटिक्समुळे यकृतातील समस्या होणे हे आता सामान्य झाले आहेत. पॅरासिटामोलमुळे 115 रुग्ण यकृताच्या समस्येने पीडित होते. त्याच वेळी, पॅरासिटामोल न घेतलेल्या 69 लोकांपैकी 19 प्रकरणे होती, ज्यांना अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे यकृताच्या समस्येचा सामना करावा लागला. तर त्यापैकी 15 लोकं असे होते जे हर्बल आणि डायट्री सप्लीमेंट घेत होते आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या यकृतावर दिसून आला.

ऑस्ट्रेलियातील यकृताच्या या अभ्यासाचे सह-लेखक ट्रान्सप्लांट हेपेटालॉजिस्ट डॉ. केन लियू म्हणाले की, पुरुषांमध्ये बॉडी बनवण्यासाठी आणि महिलांनी वजन कमी करण्यासाठी हर्बल आणि डायट्री सप्लीमेंटचा उपयोग केल्यामुळे अशा लोकांमध्ये यकृताशी संबंधित जोखीम दिसून आला. तथापि, लियू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, सप्लीमेंट्स आणि नैसर्गिक उपायांसाठी त्याचे परिणाम निश्चित करण्यासाठी अधिक संशोधन आणि चाचणी आवश्यक आहे.