Health Tips - पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप यासारखे आजारपण वाढतात. त्यासोबत अनेकांना पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा त्रासही जाणवतो. फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेला सतत खाज सुटणे, त्वचेची जळजळ आणि वेदना अशा समस्या होतात. पावसाळ्यात जास्त वेळ शूज घातल्याने किंवा पाय जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो. पावसाळ्यात हवेत ओलसरपणा असल्याने जीवांना आणि किटकांना वाढण्यास वाव मिळतो. कपडे सहज सुकत नाही, उलट त्यावरील ओलसरपणा अजून वाढतो. त्यामुळे असं कपडे घातल्यास आपल्या फंगन इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो.
फंगल इन्फेक्शन टाच आणि नखांजवळ होते. त्यामुळे हा भाग स्वच्छ ठेवण्यासोबतच ती कोरडी ठेवणे सुद्धा महत्त्वाचं आहे. या समस्येवर काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.
त्वचेचा समस्या दूर करण्यासाठी मीठ हे बेस्ट मानलं जातं. मीठामध्ये असलेले अँटीबॅक्टीरियल गुण हे फंगल इन्फेक्शनसाठी फायदेशीर ठरतं. फंगल इन्फेक्शनमुळे प्रभावीत जागेवर असलेले खराब बॅक्टीरिया दूर करण्यासाठी मीठाचा फायदा होतो. आंघोळ करण्यापूर्वी बादलीत दोन चमचे मीठ पाण्यात टाकून 15 मिनिटांसाठी पाय त्यात ठेवा. हा उपाय नियमित केल्यास काही दिवसात तुमच्या पायाला झालेलं फंगल इन्फेक्शन कमी होईल.
पावसाळ्यात जर तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल तर अनवाणी पायाने कुठे जाऊ नका. या दिवसांमध्ये तुम्ही अँटीफंगल पावडरचा वापर करु शकता. याने तुम्हाला नक्की फायदा होईल. पायात शूज घालण्यापूर्वी तुम्ही अँटीफंगल पावडर लावल्यास पायाचं संरक्षण होईल आणि पाय सॉफ्ट पण राहिल.
मीठाशिवाय बेकिंग सोडासुद्धा फंगल इन्फेक्शनवर फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही बाहेरुन घरात येता तेव्हा एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे सोडा मिक्स करा. या पाण्यात पाय 15 मिनिटांसाठी ठेवा आणि मध्येमध्ये पायाला हाताने चोळा. या उपायामुळे तुमच्या पायाचे सौंदर्य वाढणार.