बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही खाल्ली आहे का? फायदे वाचा, न खाणारे देखील आवडीने खातील

Drumstick Leaf Benefits: शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. संधीवातापासून ते मधुमेहापर्यंतच्या आजारांवर मात करता येते. शेवग्याच्या शेंगाची व पानांची भाजी खाण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. जाणून घ्या फायदे वाचून न खाणारे देखील आवडीने खातील.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 20, 2023, 03:40 PM IST
बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही खाल्ली आहे का? फायदे वाचा, न खाणारे देखील आवडीने खातील  title=
Moringa Leaves shevgyachya panachi bhaji Health Benefits for diabetes

Home remedy Diabetes: शेवग्याच्या शेंगाची व पानांची भाजी खाण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. पण या भाजीचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच ताटात आवर्जुन ही भाजी घ्याल. मधुमेहासारखे आजार आजकाल खूप सामान्य झाले आहेत. काही जणांना आनुवंशिकतेमुळं मधुमेहाचा आजार जडतो तर चुकीच्या लाइफस्टाइलमुळं डायबेटिजचा धोका वाढतो. मात्र, योग्य पद्धतीचा आहार घेतल्यास या आजारावर मात करता येते. शेवग्याच्या शेंगाही साखर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते. (Drumstick Leaf Health Benefits)

शेवग्याच्या पानांची भाजी

शेवग्याच्या शेंगाबरोबरच त्याच्या पानांचीही भाजी केली जाते. या पानांत अनेक गुणकारी घटक असतात. यात व्हिटॅमिन ए, बी 1, बी2,बी6, सी आणि फोलेटचा समृद्ध स्त्रोत असतो. त्याचबरोबर यात मॅग्नीशियम, कॅल्शियम, झिंक आयर्न आणि फॉस्फोरचा स्त्रोत असतो. काही ठिकाणी मेथीच्या भाजीप्रमाणे शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते. तर, काही ठिकाणी पाने मीठाच्या पाण्यातून उकडवून घेतात. नंतर त्यांची भाजी बनवून चपाती किंवा भातासोबत खाल्ली जाते. 

शेवग्याच्या शेंगा व पानांच्या भाजीचे फायदे

शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमुळं लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील चरबी कमी व्हावी यासाठी याच्या पानांचा काढा बनवून पिण्यास सुरुवात करा. यामुळं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. या काढ्यामुळं हाडांना बळकटी येते. कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतात. ज्यामुळं ऑस्टियोपोरोसिसच्या समस्येमुळं आराम मिळतो. 

थकवा दूर होतो

तुम्हा मानसिक समस्येने ग्रस्त आहात तर शेवग्याच्या पानांचे सेवन कराच. यामुळं मानसिक समस्येबरोबरच स्मरणशक्तीदेखील सुधारते. तुम्ही शेवग्याच्या पानांचे सुपदेखील बनवू शकता. त्यामुळं थकवा कमी होतो आणि व्हायरल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. 

स्मरणशक्ती तल्लख होते

शेवग्या शेंगा व त्याच्या पानाची भाजी लिव्हर आणि किडनी डिटॉक्सीफाइ करण्यात मदत करते. त्यामुळं पोटदुखी, अल्सरसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तणाव, चिंता दूर करण्यासाठी तसंच, थॉयराइड, ब्रेस्ट मिल्कच्या उत्पादनात वाढ होते. ज्या महिला पहिल्यांदा आई झाल्या आहेत त्यांनी ही भाजी खाल्लीच पाहिजे. 

शेवग्याच्या फुलांची भाजी

शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)