मुंबई : स्टूलमधून जर आव पडत असेल तर हे आरोग्यासाठी कोणत्याही धोक्याचे लक्षण असू शकते. आव पडत असल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
म्युकस म्हणजेच आव पडण्याची कारणं
स्टूलमध्ये आव येण्याची दोन सामान्य कारणे म्हणजे निर्जलीकरण आणि बद्धकोष्ठता. या दोन स्थितींमुळे मलमार्गे शरीरातून आव बाहेर येऊ शकते. पण या स्थितीत ही समस्या औषधांनी बरी होऊ शकते.
क्रोहन रोग (Crohn’s disease)
हा एक इंफ्लेमेट्री बाउल डिजीज आहे जो तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) मार्गावर परिणाम करतो. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अतिसार किंवा थकवा तसेच स्टूलमध्ये जास्त आव पडणे यांचा समावेश असू शकतो.
सिस्टिक फाइब्रोसिस (Cystic fibrosis)
सिस्टिक फायब्रोसिस हा एक अनुवांशिक विकार आहे ज्यामुळे फुफ्फुस, स्वादुपिंड, यकृत किंवा आतड्यांमध्ये जाड किंवा चिकट आव तयार होते. सिस्टिक फायब्रोसिसमुळे स्टूलमध्ये आव देखील होऊ शकते.
अल्सरेटिव कोलाइटिस (Ulcerative colitis)
अल्सरेटिव्ह कोलायटिस हा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) रोग आहे. त्यामुळे मोठ्या आतड्यात किंवा गुदाशयात जळजळ होते. या स्थितीत, जेव्हा शरीर अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या लक्षणांशी झुंज देत असते तेव्हा आव जास्त प्रमाणात बाहेर पडते. यामुळे स्टूलमध्ये आव वाढू शकते.
इर्रिटेबल बाउल सिंड्रोम (Irritable bowel syndrome)
इरिटेबल बोवेल सिंड्रोममुळे ओटीपोटात दुखणे आणि पेटके येतात. जे स्टूलमधील आव किंवा म्युकस येण्याशी संबंधित असू शकते.
इंटेस्टाइन इंफेक्शन (Intestinal infection)
आतड्यांसंबंधी संसर्गामुळे मलमध्ये आव देखील येऊ शकते. हे जीवाणू झपाट्याने आव तयार करतात ज्यामुळे मलसह आव येते. गंभीर अतिसार देखील स्टूलमध्ये म्युकस वाढवू शकते.
कोलन किंवा रेक्टल कँन्सर (Colon or rectal cancer)
कोलन किंवा रेक्टल कॅन्सर कोलन किंवा रेक्टलमध्ये सुरू होतो आणि त्यामुळे स्टूलमध्ये रक्त आणि आव येते.
या धोकादायक आणि गंभीर आजारांवर उपचार करून आणि तुमच्या आहारासोबत जीवनशैलीत बदल करून तुम्ही या आजारापासून बरे होऊ शकता.