मासिक पाळीदरम्यान आंघोळ का करावी लागते, याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या

myths about menstruation : मसिक पाळी दरम्यान दोनवेळा आंघोळ करायची की नाही?

Updated: Apr 27, 2022, 07:00 PM IST
मासिक पाळीदरम्यान आंघोळ का करावी लागते, याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या title=

मुंबई : मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी प्रत्येक 28 महिन्याला महिलांना येते. खरंतर महिलांसाठी हा काळ खूप कठीण काळ असतो. मासिक पाळी दरम्यान किंवा त्यापूर्वी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांना ओटीपोटात दुखणे, थकवा येणे, क्रॅम्प येणं, मूड बदलणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. खरंतर या कठीण दिवसात प्रत्येक स्त्रीने स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच या काळात स्वच्छकडे ही दृर्लक्ष करु नये कारण यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, मसिक पाळी दरम्यान बरेच लोक दोनवेळा आंघोळ करण्याचा सल्ला देतात. परंतु हे किती बरोबर आणि किती चुक आहे, याबाबत अनेक लोकांच्या मनात प्रश्न उपस्थीत झाले आहेत. (myths about menstruation)

खरं तर मासिक पाळी दरम्यान आंघोळ करणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण आंघोळ करतानाही काही खबरदारी घेणे देखील तितक आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला पीरियड्समध्ये आंघोळ करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सांगणार आहोत.

मासिक पाळीत आंघोळ का करावी? (Can You Take a Bath on Your Period)

मासिक पाळी दरम्यान संसर्ग होण्याचा धोका असतो. या दरम्यान आंघोळ केल्याने मूड फ्रेश होतो. या दिवसांमध्ये, महिला अनेकदा तणाव आणि चिंताग्रस्त असतात. अशा स्थितीत आंघोळ केल्याने त्यांचा तणाव कमी होतो. त्यामुळे दुर्गंधीही दूर होते.

मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याचा योग्य मार्ग माहित आहे का?

मासिक पाळी दरम्यान महिलांनी दोनदा आंघोळ करावी. या दिवसात आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे, ते आरोग्यदायी आहे. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने वेदना कमी होतात. थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. थंड पाण्यात अंघोळ केल्याने रक्तस्त्रावार त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात.

पीरियड्समध्ये आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा (What are the right way to bathe during your periods)

1. आंघोळीपूर्वी पॅड काढा

अनेक वेळा असे देखील घडते की, महिला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी पॅड किंवा कप वापरून आंघोळ करतात. तथापि, हे कधीही करू नये. आंघोळ करताना रक्तस्त्राव होत असेल तरी ते होऊ द्या.

2. बाथटब पूर्णपणे स्वच्छ करा

आंघोळ करताना बाथटब वापरत असाल तर आधी तो व्यवस्थित स्वच्छ करा. इतकंच नाही तर ते वापरल्यानंतर स्वच्छही केलं पाहिजे. जेणेकरून नंतर वापरल्यानंतर संसर्ग होणार नाही किंवा अशा वेळी बाथटब वापरणं टाळावं.

3. खाजगी भागांची साफसफाई

आंघोळ करताना महिलांनी प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडेही पूर्ण लक्ष दिले पाहिजे. या दिवसात स्वच्छतेसाठी रासायनिक किंवा सुगंधी उत्पादने वापरणे टाळा. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

4. जास्त वेळ आंघोळ करु नका

पीरियड्समध्ये आंघोळ व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे बराच वेळ घेऊन अंघोळ करु नका किंवा घाईघाईने देखील अंघोळ करु नका. शरीर संपूर्ण साफ होईल इतकी काळजी घ्या आणि अंघोळ झाल्यावर नवीन आणि फ्रेश, साप कपडे घाला.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)