पावसाळ्याबाबत या '4' गोष्टींचा बाऊ टाळा !

वातावरणातील अल्हाददायक वातावरणामुळे काही जणांना तो फार आवडतो तर ...

Updated: Jun 27, 2018, 02:28 PM IST
पावसाळ्याबाबत या '4' गोष्टींचा बाऊ टाळा ! title=

मुंबई : वातावरणातील अल्हाददायक वातावरणामुळे काही जणांना तो फार आवडतो तर काहींना या ऋतूतील आजरपण, चिखल यामुळे नकोसे वाटते. काही जण कुठेतरी वाचलेल्या, लिहलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून मान्सूनची मज्जा घेण्यापासून दूर राहतात. 

फळं टाळा -

पावसाळ्यात अनेकदा इन्फेक्शन पसरण्याच्या धोक्यामुळे फळं खाणं टाळली जातात. फळं हा प्राकृतिक आहार आहे. ऋतूनुसार तुम्हांला फळं खाणं आवश्यक आहे. कापून ठेवलेली, उघडी फळं खाणं टाळा. 

दही टाळा - 

पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती कमजोर होते. म्हणून आम्लयुक्त फळं खाणं टाळा. अनेकजण नकळत यामध्ये दह्याचाही समावेश करतात. मात्र दही पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. बाहेर राहिल्यास किंवा शिळं झाल्यास ते हळूहळू आंबायला लागते. पचनाच्या आजारांवर दही फायदेशीर आहे. या '४' कारणांमुळे पावसाळ्यात मासे खाणे ठरते नुकसानकारक!

पावसाचं पाणी टाळा 

प्रदूषणापासून संरक्षण मिळवण्यासाठी अनेकजण आजकाल नाक - तोंड कापडाने गुंडाळून बाहेर पडतात. पावसाचं पाणी काही त्वचा विकारांवर नैसर्गिक उपाय आहे. मात्र साचलेल्या, घाणेरड्या पाण्यामध्ये राहू नका. 

पावसात भिजल्यावर आजारी पडतात 

पावसात भिजू नका असं लहान मुलांना सतत ओरडलं जात असे. वातावरणात अचानक मोठा बदल झाल्यास आजारी पडू शकता. मात्र त्या वातावरणात तुम्ही पूर्ण आनंद घेतल्यास हा अनुभव तुमच्यासाठी रिफ्रेशिंग असेल.मुंंबईत लेप्टोचा पहिला बळी, या साथीच्या आजारापासून बचावण्यासाठी खास टीप्स