Dark Neck Home Remedies: मानेवरचे काळे डाग घालवायचे असतील पहा 'या' टिप्स

Get Rid Of Dark Neck : काही लोकांना गरमीमुळे मानेवर काळे डाग पडतात. जर तुम्हाला या समस्येपासून मुक्त होयाचं असेल तर या टीप्स बघा..

श्वेता चव्हाण | Updated: May 3, 2023, 10:36 AM IST
Dark Neck Home Remedies: मानेवरचे काळे डाग घालवायचे असतील पहा 'या' टिप्स title=
Get Rid Of Dark Neck

Dark Neck Home Remedies​ in Marathi: सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. वाढत्या उन्हामुळे अनेक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. तर काही लोक उन्हाळ्यात बरेच लोक त्यांच्या त्वचेची आणि चेहऱ्याची काळजी घेत असतात, ज्यामुळे त्यांना परिणाम जाणवत नाहीत. चेहरा आणि त्वचा साफ होत असली तरी गरमी अनेकांचा मानेवर काळे डाग दिसून येतात. यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या टिप्स वापरल्या पाहिजेत याबद्दल जाणून घ्या...

दही आणि कच्ची पपई

मानेवर येणारे काळे डाग यासाठी कच्ची पपई आणि दह्याचा वापर केला तर चांगला परिणाम दिसून येतो. यासाठी कच्ची पपई आणि दही यांची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी. त्यानंतर मानेवर लाववी, ती कोरडी झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायला हवं. असे केल्याने मानेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होईल. 

दूध, हळद आणि बेसन

मानेवरील काळे डाग मिटवण्यासाठी दूध, हळद आणि बेसनची पेस्ट फायदेशीर ठरू शकते. यासाठी तिन्ही पदार्थांची पेस्ट तयार करून घेतल्यावर दोन ते तीन दिवस मानेवर लावल्यास काळे डाग नाहीसे होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून त्याची पेस्ट मानेवर लावल्याने मानेवरवरील काळे डाग मिटतात.

लिंबू आणि मध

मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि तेवडंच मध घेऊन पेस्ट तयार करा. त्यामुळे मानेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते, याशिवाय त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

कोरफड आणि काकडीचा वापर

कोरफड आणि काकडीचा वापर करून तुम्ही मानेचा काळेपणा दूर करू शकता. कोरफडीचे जेल आणि काकडीचा रस एकत्र करून लावल्याने मानेचा काळपटपणा दूर होतो. यासोबतच त्वचेचा कोरडेपणाही दूर होतो.

कोरफड आणि मुलतानी माती

कोरफड आणि मुलतानी मातीचा वापरूनच तुम्ही काळी त्वचा चमकदार करू शकता. यासाठी मुलतानी माती, कोरफडीचे जेल आणि गुलाबपाणी मिसळा आणि गोळा करा. आणि मानेला लावा थोडा वेळाने कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा करा. 

मानेवर काळेपणा हा उन्ह आणि घामामुळे पण येत असतात. म्हणूनच अंगोळ करताना मानेवरील मळ कापडाने घासून काढा. हे नियमित केल्यास काळेपणा येत नाही.

 

(Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)