रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी '3' रामबाण नैसर्गिक उपाय

भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. विविध वयाच्या टप्प्यातील लोकं मधूमेहाशी सामना करत आहेत. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, व्यायाम या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर, इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अळशीचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  

Updated: Aug 12, 2018, 05:20 PM IST
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी '3' रामबाण नैसर्गिक उपाय

मुंबई : भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. विविध वयाच्या टप्प्यातील लोकं मधूमेहाशी सामना करत आहेत. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, व्यायाम या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर, इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अळशीचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  

मधुमेहींची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे नैसर्गिक उपाय 

अळशीच्या बीयांमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील साखर कमी होण्यासोबतच फॅट्स कमी करण्याचीही क्षमता असते. सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर अळशीच्या बीया चावून चावून खा. त्यावर ग्लासभर पाणी प्यावे.  

कडुलिंबाची पानंदेखील आरोग्याला फायदेशीर आहेत. यामुळे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण सुधारते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी ग्लासभर पाण्यात 8 कडुलिंबाची पानं उकळा. हे पाणी गाळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

आवळ्यातील व्हिटॅमिन सी घटक स्वादूपिंडाचे कार्य सुधारायला मदत करतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कपभर पाणी दोन चमचे आवळ्याचा रस मिसळा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.