पायावरील टॅन हटवेल हा घरगुती पॅक

फॅशनेबल सॅडल्स, स्ट्रेपी हिल्स घालणं तुम्हांला आपल्याला पसंत असतं. पण उन्हात खूप वेळ फिरल्यास पायावर टॅनचे डाग पडतात. पेडीक्युअर केल्याने डेड स्किन आणि तणाव दूर होतो. पण काळवंडलेल्या त्वचेचे काय ? या तुमच्या प्रश्नाला ब्युटी एक्सपर्टने दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल.  

Updated: May 1, 2018, 07:41 AM IST
पायावरील टॅन हटवेल हा घरगुती पॅक  title=

मुंबई : फॅशनेबल सॅडल्स, स्ट्रेपी हिल्स घालणं तुम्हांला आपल्याला पसंत असतं. पण उन्हात खूप वेळ फिरल्यास पायावर टॅनचे डाग पडतात. पेडीक्युअर केल्याने डेड स्किन आणि तणाव दूर होतो. पण काळवंडलेल्या त्वचेचे काय ? या तुमच्या प्रश्नाला ब्युटी एक्सपर्टने दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल.  

संत्र आणि दुधाचा पॅक – 

संत्र्याची साल नॅचरल ब्लिच म्हणून काम करते. यामुळे काळवंडलेली त्वचा नितळ होण्यास मदत होते. दूधातील लॅक्टीक अ‍ॅसिड त्वचेवरील डेड स्किनचा थर मोकळा करण्यास मदत करतात. दुधातील मॉईशचरायाझिंग घटक त्वचा मऊ करण्यास मदत करतात.

कसा कराल हा पॅक 

संत्र्याची सालं उन्हात वाळवून त्याची बारीक पावडर करावी.
4-5 टेबलस्पून दूधात तयार पावडर मिसळून जाडसर पेस्ट बनवा.
पेस्ट पायावर लावून 20-25 मिनिटे सुकू द्या.
त्यानंतर कोमट पाण्याने हा पॅक स्वच्छ धुवा.
टॉवेलने पाय कोरडे करा. नंतर पायांना माईल्ड मॉईशचरायझर लावा.
हा प्रयोग आठवड्यातून तीन वेळेस केल्याने डाग हळूहळू कमी होण्यास मदत होईल.

लिंबू व मधाचा पॅक –

लिंबातील अ‍ॅसिडीक घटक नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते. तर मध हे उत्तम मॉईशचरायझर आहे.

कसा कराल हा पॅक 

एक टिस्पून मध व लिंबाचा रस एकत्र करावा.
तयार मिश्रणामध्ये चमचाभर दूध किंवा दुधाची पावडर मिसळावी.
आता हा तयार पॅक पायावर लावावा.
20 मिनिटांनी कोमट पाण्याने पॅक स्वच्छ धुवा.
त्यानंतर पायावर सनस्क्रिन लावा. त्यानंतरच बाहेर पडा.