Navratri 2022: चुकूनही फळांवर मीठ टाकू नका; धोका वाढवण्यापूर्वी वाचा ही माहिती

तुम्हीही फळांवर मीठ शिवरून खाताय का? डायबिटीजच्या रुग्णांनी तर आताच वाचा ही बातमी...   

Updated: Sep 27, 2022, 09:30 AM IST
Navratri 2022: चुकूनही फळांवर मीठ टाकू नका; धोका वाढवण्यापूर्वी वाचा ही माहिती  title=
Navratri 2022 dont put sendha namak salt while eating fruits know the reason

Fruit salad: नवरात्रोत्सवाची (Navratri 2022) दमदार सुरुवात झाली आहे. या दरम्यानच्या काळात असंख्य अशी मंडळी आहेत जे देवीची आराधना करण्यासोबतच उपवासही ठेवतात. अशा सर्वांसाठी या काळात ठराविक गोष्टीच अन्न स्वरुपात ग्रहण करण्यास परवानगी असते. त्यातलीच एक म्हणजे फळं. फळांमध्ये असणारी (Fruits protein) पोषक तत्वं शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता करतं. त्यामुळं ()Fasting Food उपवास करुनही फळांमुळे पोटाला मोठा आधार मिळतो. फळं खाताना अनेकजण त्याची चव आणखी वाढावी म्हणून त्यावर मीठ शिवरतात. काहीजण उपवासादरम्यान सर्वसामान्य मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर करतात. पण, ही फारच वाईट सवय. 

मीठ न शिवरता फळं खाणं कायमच फायद्याचं ठरलं आहे. उलटपक्षी फळांवर चाट मसाला, सैंधव किंवा साधं मीठ घालून ती खाणं हृदयरोगाचा धोका वाढवतं. कारण, सैंधव मीठात आयोडीन (iodine) नसतं. परिणामी त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरतं. (Navratri 2022 dont put sendha namak salt while eating fruits know the reason)

नॉन आयोडाइज्ड मीठात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळं हृदयावर त्याचे थेट परिणाम दिसून येतात. शिवाय फळांवर सैंधव मीठ टाकल्यास त्यामुळं पोटाच्या समस्याही जाणवतात. त्यामुळं फळं एकतर काहीही न मिसळता किंवा लिंबाचा रस मिसळूनच खा. 

अधिक वाचा : फळे-भाज्या लवकर खराब होऊ नये म्हणून वापरा ही ट्रीक, राहतील जास्त काळ फ्रेश

 

मधुमेह असणाऱ्यांनी घ्या अधिक काळजी (diabetes)
उपवास ठेवताना मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. कारण, तुम्हाला जर हा त्रास असेल तर दिवसातून फक्त दोन वेळाच फळं खा. फ्रूट सलाडमध्ये कधीही चाट मसाला किंवा जास्तीची साखर मिसळू नका. गरजेपेक्षा जास्त साखर खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.