Omicron BA.2 : भारतात ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री

Omicron subvariant BA.2 भारतात आढळून आला आहे. ज्यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढलीये.

Updated: Jan 24, 2022, 02:01 PM IST
Omicron BA.2 : भारतात ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री title=

मुंबई : पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं लक्षात आलंय. यामध्ये कोरोनाचा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा अधिक प्रभाव दिसून येतोय. याच दरम्यान, Omicron subvariant BA.2 आढळून आला आहे. ज्यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढलीये. आतापर्यंत भारतात या सब-व्हेरिएंटचे 530 नमुने सापडले असल्याची माहिती आहे. 

देशात ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटची एन्ट्री

ओमायक्रॉनच्या सब-व्हेरियंटने यूकेमध्ये थैमान घातलं आहे. यानंतर या सब-व्हेरिएंटने भारतातंही एन्ट्री घेतलीये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, BA.2 व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरतो. ब्रिटनच्या आरोग्य विभागाने ओमिक्रॉनच्या या सब-व्हेरिएंटच्या शेकडो प्रकरणांनी नोंद केली असल्याचं म्हटलंय. 

भारतात मिळाले 350 नमुने

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसांत यूकेमध्ये या व्हेरिएंटची 400 हून अधिक प्रकरणं दिसून आली आहेत. एका ऑनलाइन न्यूज  मीडिया रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनच्या या सब-व्हेरियंटचे 530 नमुने भारतात सापडले असल्याची माहिती आहे. तर स्वीडनमध्ये 181 आणि सिंगापूरमध्ये 127 नमुने आढळले आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ओमायक्रॉन व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ कर्न्सर्न' या श्रेणीमध्ये गणलं आहे. WHOच्या म्हणण्याप्रमाणे, ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 देखील त्यासारखाच आहे. या दोन्हींमध्ये कोणताही मोठा फरक नाही. कोरोनाच्या साथीवर याचा कसा परिणाम होऊ शकतो हे ठरवण्यासाठी तज्ज्ञ त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.