Cholesterol Check: तळ हात आणि पाय देतात शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलबाबत अलर्ट, कसा जाणून घ्या

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं पाहा हात, पाय आणि गुडघ्यांवर

Updated: Sep 29, 2022, 12:09 AM IST
Cholesterol Check: तळ हात आणि पाय देतात शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलबाबत अलर्ट, कसा जाणून घ्या title=

Cholesterol Check : रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. अशात एक दिवस असा येतो जेंव्हा वेळ निघाहून गेलेली असते. एक दिवस असा येतो जेंव्हा आपल्याला थेट हॉस्पिटल गाठावं लागतं. सध्या हार्ट ऍटॅक येण्याचं प्रमाण तरुणांमध्ये प्रचंड वाढलेलं पाहायला मिळतंय. तिशी पस्तिशीत तरुणांना हार्ट ऍटॅक येताना पाहायला मिळतात. याचं मुख्य कारण ठरतं तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल. तुमची कोलेस्ट्रॉलची संख्या वाढल्याने तुम्हाला हार्ट ऍटॅकचा धोका वाढतो. 

आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलवर अनेक प्रकारचे रिसर्च झालेत. ज्यावेळी कोलेस्ट्रॉल आपल्या रक्त्तवाहिन्यांमधून हृदयाच्या दिशेने प्रवाहित होतं किंवा हृदयात यामुळे ब्लॉकेज तयार झाल्यास तुम्हाला विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते.  मात्र असं होत असताना तुमच्या शरीरावर याचे विविध परिणाम देखील पाहायला मिळतात. द अमेरिकन अकॅडेमी ऑफ डेर्मेटोलॉजी असोसिएशनने याबाबत महत्त्वाचा रिसर्च करून निष्कर्ष काढले आलेत. 

तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं की कोणती लक्षणे पाहायला मिळतात?

  • शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ यायला सुरुवात होते. 
  • शरीरावर निळ्या पिवळ्या किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात 
  • हात आणि पायाचे तळवे किंवा गुडघ्यांवर देखील असे विशिष्ट पुरळ पाहायला मिळतात  

अशात तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलेलं बरं. शरीरातील कोलेस्ट्रॉल  कमी करण्यासाठी सर्वात आधी तुमची जीवैशैली बदला. तुमच्या आहारात शरीरासाठी पोषक पदार्थांचा समावेश करा. प्रोसेस्ड फूड खाणं, बाहेरील अन्नपदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. तुमच्या आहारात साखरेचं प्रमाण जास्त आहे का हेही तपासा. ते जास्त असल्यास शरीरात जणारी साखर कंट्रोल करा. कोल्डड्रिंक पिण्याची सवय असल्यास तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात शुगर जातेय हे लक्षात घ्या. तुमच्या जेवणातून शरीरात प्रोटिन्स जातायत का तेही तपास. शरीरात प्रोटिन्स जाणे गरजेचे. दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा. 

नोंद - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.