Zombie gene : मानवी शरीर (Human Body) असं आहे, जिथे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen Supply) बंद झाला की, काही मिनिटांनंतर अवयवांची सगळी व्यवस्था ठप्प होते. याला 'पॉइंट ऑफ नो रिटर्न' (Point of No Return) असं म्हटलं जातं. याचाच अर्थ इथून पुन्हा परतणं शक्य नाही. ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीराचं तापमान प्रत्येक तासाला दीड ते 2 डिग्री खालावतं. पेशी (cells) मेल्यानंतर शरीरातून एक वेगळा गंध बाहेर पडतो. अशावेळी काही अवयव (Organs) काम करतंही असतात, मात्र अगदी काही वेळ. आता तज्ज्ञांना मेंदूमध्ये (Brain gene) एक असा जीन सापडला आहे, जो मृत्यूनंतर एक्टिव्ह होतो. इतकंच नाही तर तो जलद गतीने वाढू देखील लागतो.
यूनिवर्सिटी ऑफ इलिनॉयसच्या संशोधकांनी न्यूरोलॉजिकल कंडीशनने ग्रस्त असलेल्या एका रूग्णाच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या ब्रेन टिश्यूंना वेगळ काढून त्यांच्यावर अभ्यास केला. यामध्ये त्यांनी पाहिलं की, बाकी पेशी मरून गेल्या होत्या, मात्र एक पेशी जिवंत होती.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पेशी फार जलद गतीने वाढत असल्याचं समोर आलं. ही गोष्ट समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी दुसऱ्यांदा स्टिम्युलेटेड ब्रेन एक्सपेरिमेंट केलं. ज्यामध्ये मेंदूच्या पेशींना खोलीच्या सामान्य तापमानावर ठेऊन 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवलं.
जशी अपेक्षा होती त्यानुसार, असं समोर आलं की, मेंदूचा निर्णय घेण्याचा आणि लक्षात ठेवण्यासाठी मदत करणारी पेशी पटकन त्यांचे गुणधर्म गमावतात. तर Zombie gene त्याच 24 तासांमध्ये केवळ एक्टिवच होत नाहीत तर जलद गतीने वाढून त्याचं प्रमाणही वाढलं. हे जीन्स ग्लिअन सेल्सचा एक वर्ग असल्याचं आढळून आलं, जे अनेकदा डोक्याला दुखापत झाल्यावर काम करतात.
असं मानलं जातंय की, Zombie gene चं कामच असं असणार आहे. ते अंदाजाच्या मदतीने मेंदूला काम करण्यासाठी मदत करतात.
तुम्हाला माहिती आहे का की, मृत्यूनंतर शरीरातील अनेक अवयव काम करत असतात. यामध्ये यकृत, किडनी आणि हृदय यांचा समावेश आहे. अवयव दानाच्यावेळी लक्ष दिलं जातं की, डोनरच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासापासून ते 6 तासांपर्यंत अवयव डोनेट होऊन प्रत्यारोपित केले जातात.
मृत्यूनंतर शरीरात अनेक एक्टिव्हीटी देखील होत असतात. जसं की, केस आणि नखांची वाढ. इतकंच नव्हे तर पोटात असणारे गुड बॅक्टेरिया हे अन्न पचवण्याचं काम करत असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)