मुंबई : बऱ्याच लोकांच्या या समस्या आहेत की, त्यांचे दात अचानक संवेदनशील होतात. काही लोकांचे दात थंड पदार्थ खाल्यामुळे, तर काही लोकांचे दात गरम खाल्यामुळे देखील संवेदशील होतात. ज्यामुळे अनेक लोकांचे डोके देखील दुखू लागतात. दाताची समस्या होणं हे खूपच भयंकर आहे. एकदा का दात दुखायला लागला की, संपलंच सगळं म्हणून समजा. कारण दात दुखायला लागल्यावर लोकांना काहीही सुचत नाही. त्यामुळे अशा समस्यांना बळी पडू नेय म्हणून तुम्हाला सावध होण्याची गरज आहे आणि दातांची काळजी घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला हे माहित आहे का की, तुमचे दात इनॅमल नावाच्या थराने झाकलेले असतात, तर दातांच्या आतील थराला डेंटिन म्हणतात. जर वरचा थर काढून टाकला किंवा तो कोणत्याही प्रकारे खराब झाला, तर डेंटिन बाह्य वातावरणाच्या संपर्कात येतात ज्यामुळे दातांना संवेदनशीलता येते.
दाताला होणारी संवेदनशीलता टाळण्यासाठी 5 मार्ग आहेत.
ज्या लोकांचे दात संवेदनशील होत असतील, तर अशा लोकांसाठी लवंगाचे तेल फायदेशीर आहे आणि त्यामुळे त्यांना या दुखण्यापासूनही आराम मिळतो. याच्या वापराने तोंडातील जंतू निघून जाण्यास देखील मदत होते.
जर तुम्हाला दातांच्या खूप जास्त समस्या येत असतील तर, लसून त्यावर चांगला पर्याय आहे. तुम्ही लसणाची कळी कापून थेट तुम्हाला ज्या भागात त्रास होत आहे तेथे ठेवा. यामुळे अॅलिसिन हे बॅक्टेरिया कमी करते, ज्यामुळे खूप आराम मिळतो.
मिठाच्या पाण्याने दिवसातून दोनदा गुळण्या करा यामुळे तुमचा घसाच नाही तर तुमच्या दातांना देखील आराम मिळले. यामुळे तुम्हाला दातांच्या सेन्सिटीव्हिटीला कमी करण्यासाठी मदत मिळते. मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे जे, जंतुना कमी करतात. तुम्ही एक कप कोमट पाण्यात मीठ मिसळा आणि त्याच पाण्याने चुळ भरा.
दिवसातून दोनदा माऊथवॉश म्हणून ग्रीन टी वापरा. ग्रीन टी तुमचे दात मजबूत करण्यास आणि सेन्सिटीव्हिटी कमी करण्यास मदत करते.
कांदा हा एक प्रसिद्ध घरगुती उपाय आहे, ज्यामध्ये प्रतिजैविक आणि विरोधी दाहक गुणधर्म आहेत. कांदा कापून दुखत असलेल्या दातांवर ५ मिनिटे ठेवा, तुम्हाला लगेच आराम मिळेल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)