बापरे! सर्दी-खोकल्याच्या व्हायरसने लाखभर चिमुकल्यांचा घेतला बळी

द लॅन्सेट' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

Updated: May 22, 2022, 07:55 AM IST
बापरे! सर्दी-खोकल्याच्या व्हायरसने लाखभर चिमुकल्यांचा घेतला बळी title=

मुंबई : सर्दीसारखी लक्षणं असलेल्या सामान्य व्हायरसने 2019 मध्ये जगभरात 5 वर्षांखालील सुमारे 1,00,000 मुलांचा बळी घेतला आहे. 'द लॅन्सेट' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. हा अभ्यासामध्ये लहान मुलांच्या रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरसच्या (RSV) परिणामांची माहिती घेण्यात आली आहे.

या अभ्यासानुसार, 2019 मध्ये शून्य ते सहा महिने वयोगटातील 45,000 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला. RSV मुळे जगभरातील पाचपैकी एक मृत्यू या वयोगटात होतो.

संशोधनाचे सह-लेखक हरीश नायर यांनी सांगितलं की, RSV हे लहान मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराचं मुख्य कारण आहे. आमचा अंदाज आहे की, सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुलं जास्त संवेदनाशील असतात. 

नायर पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत जन्मलेल्या मुलांना आरएसव्हीची लागण झालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये या व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झालेली नाही. 

RSV साठी अनेक लसी आहेत आणि प्राधान्याने कोणाला लस द्यायची हे ठरवलं जातंय. नवजात बालकांना यापासून संरक्षण मिळावं यासाठी गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आल्याचं नायर यांनी सांगितलं.