Sexual Problem : स्त्री-पुरुषांच्या लैंगिक समस्येवर प्रभावी ठरते 'ही' पावडर, जाणून घ्या फायदे...

Sexual Problem : लैंगिक समस्येमुळे वैवाहिक जीवनात जोडप्यामध्ये तणाव निर्माण होतो. अनेक वेळा या कारणामुळे किती जणांचे संसार मोडले आहेत. पण जर तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर हे एक पावडर तुमचं आयुष्य बदलेल. 

Updated: Feb 8, 2023, 04:55 PM IST
Sexual Problem : स्त्री-पुरुषांच्या लैंगिक समस्येवर प्रभावी ठरते 'ही' पावडर, जाणून घ्या फायदे... title=
Sexual Problems Remedy for male and female maca root powder Benefits in marathi

Maca Root Powder Benefits : सध्या सगळीकडे प्रेमाचा उत्सव (Valentine Week 2023) साजरा केला जातो. प्रेम आणि विश्वास असेल तर तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहतं. पण याशिवाय वैवाहिक जीवनातील सुखी संसारचं अजून एक गुप्त असते ते म्हणजे शारीरिक सुख (physical pleasure)...पण जर यातच काही समस्या असतील तर वैवाहिक जीवनात (married life) प्रॉब्लेम येतात. लैंगिक समस्येवर (Sexual Problem) आजही अनेक जण खुलेपणाने बोलत नाही किंवा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेत नाही. त्यामुळे अशावेळी जोडीदार नाराज होतो आणि वैवाहिक जीवनात ताण निर्माण होतो. या लैंगिक समस्येमुळे अनेकांचे संसारही संकटात आले आहेत. पण आयुर्वेदात (Ayurvedic remedies) एक रामबाण उपाय सांगण्यात आला आहे. ज्यामुळे तिची ही समस्या नक्कीच बरी होईल. 

'ही' एक पावडर आणि...

तुम्ही माका रूटबद्दल (Maca Root) ऐकलं आहे का?  माका रूटला वैज्ञानिकदृष्ट्या लेपिडियम मेयेनी (Lepidium meyeni) असंही म्हणतात. माका रूट स्‍त्री आणि पुरुष दोघांच्‍या लैंगिक स्‍वास्‍थ्‍यासाठी ही खूप जास्त फायदेशीर आहे. माका ही क्रूसीफेरस भाजी असून ती ब्रोकोली, फ्लॉवर, कोबीशी संबंधित आहे. पेरूचे लोक याचं सेवन मोठ्या प्रमाणात करतात. भारतातही याचं उत्पादन होत असून आयुर्वेदात औषध म्हणून याचा वापर केला जातो. माका वनस्पतीचा मुख्य खाद्य भाग हे त्याचं मूळ आहे, जे जमिनीखाली वाढतं. (Sexual Problems Remedy for male and female maca root powder Benefits in marathi)

खराब कोलेस्ट्रॉल वाढत नाही

माका रूट हे अनेक रंगांमध्ये उपलब्ध असते. माका रूट सहसा वाळवलं जातं आणि पावडर स्वरूपात त्याचं सेवन केलं जातं. माका रुट हे बीटरूट सारखं असून त्याची मुळं वाळवून चूर्ण करून वापरली जातात. माका रूटमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि चरबीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तसंच यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त

सध्या लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. त्यात चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अंमली पदार्थांचं सेवन आणि नैराश्य यासारख्या समस्यांमुळे स्त्री-पुरुष दोघांच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. या समस्येत माका पावडर प्रभावी ठरतं. या पावडरच्या सेवनाने लैंगिक इच्छा वाढते. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या समस्येनंतर जे काही दुष्परिणाम होतात, त्यावरही ही पावडर फायदेशीर ठरतं. यासह माका पावडर नैराश्य आणि तणाव दूर करण्यास मदत करतं. मूड फ्रेश करण्यासाठी देखील माका पावडर घेतली जातं.

कर्करोगाचा धोका कमी होतो

माका रूट पावडर प्रोस्टेट कर्करोगाच्या समस्येवरही प्रभावी ठरतो. प्रोस्टेट ग्रंथी फक्त पुरुषांमध्ये आढळतं. प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, ज्याला सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (BPH) देखील म्हणतात, हे पुरुषांमध्ये वयानुसार सामान्य आहे. वाढलेल्या प्रोस्टेटमुळे लघवी करताना विविध समस्या उद्भवू शकतात. या समस्येत रेड माका रूट प्रोस्टेटचा आकार कमी करतो. यासह माका रूटचा अनेक प्रकारे औषधी वापर करता येतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)