Raisins Water: मनुक्याचे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत परिणाम?

चला तर मग जाणून घेऊया की मनुक्यांचे पाणी (Raisins Water) हे तुमच्या शरीरासाठी किती आणि कसं फायदेशीर आहे. दिवसातून तुम्ही किती वेळी मनुक्यांचे पाणी पिऊ शकता.

Updated: Feb 8, 2023, 04:56 PM IST
Raisins Water: मनुक्याचे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत परिणाम?  title=

Benefits of Raisins Water: मनुक्यांचे एक नाही तर हजार फायदे आहेत. आपल्याला मनुके खाल्ल्यानं शरीरासाठी अनेक फायदे होऊ शकतात. आपल्या शरीरासाठी ड्रायफ्रुड्स (Dryfruits Benefits) हे लाभदायी ठरतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील अनेक आजारांसाठी ड्रायफ्रुट्स फायदेशीर ठरतात. त्यातीलच एक म्हणजे काळे आणि पांढरे मनुके. हे मनुके (Raisins) आपण पाण्यात भिजवून किंवा सुकेही रिकाम्या पोटी खाऊ शकतो. परंतु तुम्हाला माहितीये का की, मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.

चला तर मग जाणून घेऊया की मनुक्यांचे पाणी (Raisins Water) हे तुमच्या शरीरासाठी किती आणि कसं फायदेशीर आहे. दिवसातून तुम्ही किती वेळी मनुक्यांचे पाणी पिऊ शकता. आपल्याला अनेकदा ड्राय फ्रुड्सचे आपल्या शरीरासाठी असलेले महत्त्व माहिती असते. परंतु तुम्हाला माहितीये का या ड्रायफ्रूट्सचे (How to make Raisins Water) पाणीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यातील एक आहे ते म्हणजे मनुक्यांचे पाणी. 

मनुक्यांच्या पाण्यात नक्की कोणकोणते गुणधर्म आहेत? 

मनुक्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे (Vitamins) असतात त्याचबरोबर खनिजंही (Minerals) असतात. आजकाल हृदयासंबंधीच्या समस्या असतात तेव्हा अशा लोकांना मनुक्याचे पाणी फायदेशीर ठरते. यकृतसाठीही तुम्ही मनुक्यांचे पाणी पिऊ शकता. मनुक्यांच्या पाण्यात फायटोन्यूट्रिंएट्स आणि व्हिटॅमिन ए (Vitamin A) असते जे तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर असते. मनुक्यात असलेले पोटॅशियम तुमचा रक्तदाब नीट ठेवण्यास मदत करते. मनुक्यांच्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असते त्याप्रमाणे आपल्या हाडांना त्याचा फायदा होतो.

मनुक्यांच्या पाण्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजही असते ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. मनुक्यांच्या पाण्यात फिनॉल, व्हिटॅमीन सी (Vitamin C) आणि अन्टी ऑक्सिडंट्स (Anti - Oxidantants) असतात ज्यानं वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. मनुक्यांच्या पाण्यामध्ये असणारे मेलेटोनेनमुळे तुम्हाल निद्रानाशाचा जर त्रास होत असेल तर तोही कमी होतो. 

काय आहे मनुक्याच्या पाण्याचे फायदे? 

  • तुम्ही दररोज या पाण्याचे सेवन केलेत तर तुमच्या शरीरात जमा होणारे हानिकारक घटक मग यामुळे कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील रक्त स्वच्छ होते आणि तुमचे यकृतही (Liver) डिटॉक्स होण्यास मदत होते. 
  • आपल्या शरीरात आम्लपित्त तयार झाले असेल तर ते पाणी प्यायल्यास आपल्या एसिटिडी आणि त्यामुळे होणाऱ्या अपचनाचाही त्रास होत नाही. 
  • त्याचबरोबर वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला मनुक्यांचे पाणी पिण्याचा फायदा हा हृदयासाठीही होऊ शकतो. त्यानं आपले कॉलेस्ट्रॉल (Cholestrol) कमी होण्यास मदत होते.   
  • मनुके खाल्ल्यानं आपल्या शरीराचे वजनही कमी होण्यास मदत होते. 
  • मनुक्यांमध्ये लोहही असते ज्यामुळे आपल्या शरीराच्या रक्तातील लोह्यांचे (Iron) प्रमाण वाढण्यास मदत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)