मुंबई : आताचं जीवनमान दिवसेंदिवस बदलत आहे. लहान मुलांच्या शारिरीक आणि बौद्धिक वाढीत खूप मोठा बदल होताना दिसत आहे. आता एका संशोधनातून अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधनात लहान मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर खूप मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
संशोधनात असं समोर आलं आहे की, भारतीय मुलांच्या रक्तात वाढत असलेल्या सिशांची मात्रा त्यांच्या बौद्धिक क्षमतेला प्रभावित करत आहे. याप्रमाणेच लहान मुलांमध्ये इतर आजारांचा धोका देखील वाढत आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियात जालेल्या एका संशोधनात ही चिंता व्यक्त करण्यात आली.
ऑस्ट्रेलियात मॅकक्वेरी युनिर्व्हसिटीमध्ये संशोधनकर्त्यांनी भारतातील लहान मुलांच्या रक्तातील शिश्यांच्या स्तरावरून हे मोठं संशोधन केलं आहे. यामध्ये असं आढळून आलं की, त्यांच्यातील रक्तातील लेडच्या प्रमाणामुळे आजारांची शक्यता अधिक आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये सांगितलं आहे की, आयुर्वेदिक औषध, नूडल्स आणि मसाल्यांमुळे लहान मुलांच्या अंगात लेडचे प्रमाण वाढत आहे.