Diabetes च्या रुग्णांनी द्राक्षं खावीत की नाही? जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांना अनेक पदार्थ आणि फळं न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

Updated: Jun 22, 2022, 07:53 AM IST
Diabetes च्या रुग्णांनी द्राक्षं खावीत की नाही? जाणून घ्या title=

मुंबई : मधुमेहाच्या आजारावर कोणताही इलाज नाहीये. त्यामुळे जर मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांना अनेक पदार्थ आणि फळं न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वच फळे फायदेशीर असतात असं नाही. मधुमेही रूग्णांनी काही फळांपासून दूर राहणं पसंत करावं. मुख्य म्हणजे, रुग्णांनी काहीही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा परिस्थितीत आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाऊ नयेत हे जाणून घेऊया.

द्राक्ष

मधुमेहाच्या रुग्णांसाठी द्राक्षं अत्यंत हानिकारक मानली जातात. या फळांमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण चांगलं असतं, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु त्यात असलेल्या साखरेचं प्रमाण मधुमेहाच्या रुग्णांची समस्या वाढवू शकते. त्यामुळे द्राक्षापासून मधुमेहाच्या रुग्णांनी लांब राहिलेलेच चांगलं आहे.

केळी

मधुमेही रूग्णांनी केळ्याचं सेवन नये. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. 

अंजीर

अंजीर खाणं देखील मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतं. अंजीरमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा स्थितीत याचं सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी अंजीरापासून दूर राहणेच फायदेशीर आहे.