Side Effects Of Eating Almonds: बदाम खाण्याची पण असते एक मर्यादा, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास काय होतं ते वाचा

जास्त प्रमाणात बदाम खाल्यानंं होऊ शकतात हे त्रास...

Updated: Jan 15, 2023, 06:53 PM IST
Side Effects Of Eating Almonds: बदाम खाण्याची पण असते एक मर्यादा, गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास काय होतं ते वाचा title=

Side Effects Of Eating Too Much Almonds : ड्रायफ्रुट्स (Dry Fruits) खायला हवे हे आपल्याला घरातील मोठे नेहमीच सांगतात. त्यामुळे आपल्या हाडांना तेल मिळण्यापासून ताकदही वाढते. बदाम (Almonds)  हा एक असा ड्राय फ्रूट आहे जो केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक मोठ्या आवडीने खातात. बदाम खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि स्मरणशक्ती वाढते असे म्हणतात. फायदे जाणून अनेक लोक बादाम जास्त प्रमाणात सेवन करू लागतात. असे केल्याने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते. तर जास्त प्रमाणात बदामाचे दुष्परिणाम जाणून घेऊया.

जास्त बदाम खाण्याचे तोटे

1. किडनी स्टोनचा धोका

बदाम जास्त प्रमाणात खाणे आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. बदाममध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

2. रक्तस्त्राव

बदाममध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असतात. जर तुम्ही बदाम जास्त खाल्ले तर व्हिटॅमिनचा ओव्हरडोस होईल आणि त्यामुळे रक्तस्राव सारख्या गंभीर आजार होई शकतात. 

हेही वाचा : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?

3. शरीरात टॉक्सिन वाढेल

बदामाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ वाढू शकतात, जे पोटासाठी चांगले नाही. यामुळेच गर्भवती महिलांना बदाम न खाण्याचा सल्ला दिला जातो.

4. बद्धकोष्ठता

बदामामध्ये भरपूर फायबर असते जे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पचनामध्ये समस्या उद्भवू शकतात.

5. लठ्ठपणा

जर तुम्हाला वजन वाढण्याची काळजी वाटत असेल तर कधीही जास्त बदाम खाऊ नका कारण त्यामुळे तुमचे वजन वाढेल आणि पोटाभोवती चरबी जमा होऊ लागेल.

6. पोषण मिळण्यात अडचण

जर एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात बदाम खात असेल तर त्यामध्ये असलेल्या फायबरमुळे कॅल्शियम, आयरन, झिंक आणि मॅग्नेशियमच्या वाढण्यास अडथळा निर्माण होतो.

7. श्वासाच्या समस्या

मर्यादेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने शरीरातील एचसीएनची पातळी वाढते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय, नर्व्हस ब्रेकडाउन आणि श्वास अडकण्याचा धोका देखील असतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)