Grapes Side Effects : आवडीने द्राक्ष खात असाल, तर याबाबत 'ही' माहिती असणे गरजेचं

आपल्याला हे माहित आहे की फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु तुम्हाला माहितीय का की द्राक्षाचा तुमच्या शरीरावर निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे धोकादायक आहे. फळांच्याबाबतीतही तसेच आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला द्राक्षे जास्त खाल्ल्‍याने होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.

Updated: May 9, 2022, 10:54 PM IST
Grapes Side Effects :  आवडीने द्राक्ष खात असाल, तर याबाबत 'ही' माहिती असणे गरजेचं title=

मुंबई : आपल्याला हे माहित आहे की फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु तुम्हाला माहितीय का की द्राक्षाचा तुमच्या शरीरावर निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे धोकादायक आहे. फळांच्याबाबतीतही तसेच आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला द्राक्षे जास्त खाल्ल्‍याने होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.

द्राक्षांचा आकार लहान असला तरी त्याची चव बहुतेकांना आवडते. हे रसाळ फळ लोक उन्हाळ्यात जास्त खातात. त्यामुळे योग्य प्रमाणात द्राक्षे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्यास ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

आज आम्‍ही तुम्‍हाला मोठ्या प्रमाणात द्राक्ष खाल्ल्याने काय दुष्परिणाम होते या विषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ

पोटाचा त्रास होऊ शकतो

जास्त द्राक्षे खाल्ल्याने जुलाब होऊ शकतात. द्राक्षांच्या आत अशी काही खनिजे असतात, की जर ती शरीरात जास्त प्रमाणात गेली, तर लूज मोशनची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला आधीच अशी कोणतीही समस्या असेल, तर द्राक्षे अजिबात खाऊ नका.

तुमचे वजन वाढू शकते

जर तुम्ही जास्त प्रमाणात द्राक्षे खात असाल, तर त्यामुळे तुमचे वजनही वाढू शकते. द्राक्षांमध्ये कॅलरीज जास्त असतात. शरीरातील कॅलरीज वाढल्याने वजन वाढते. अशा स्थितीत द्राक्षांचे अतिसेवन शरीरासाठी फायदेशीर ठरत नाही. याशिवाय द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला मधूमेहाचाही त्रास उद्भवू शकतो.

ऍलर्जीचा त्रास वाढू शकतो

शरीरातील कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो. द्राक्षे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहेत. परंतु जास्त द्राक्षे खाल्ल्यास शरीरात अ‍ॅलर्जी होऊ शकते. द्राक्षांमुळे शरीरात लाल पुरळ, खाज सुटणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात, अशा स्थितीत द्राक्षांचा वापर मर्यादेतच करावा.