नाश्त्याला वापरतो त्या पोह्यांपासून आपण करू शकतो त्वचेचं संरक्षण; कसं? एकदा जाणून घ्याच

या पोह्यांपासून तुम्ही चेहऱ्याचा स्क्रबही बनवू शकता.

Updated: Oct 3, 2022, 05:28 PM IST
नाश्त्याला वापरतो त्या पोह्यांपासून आपण करू शकतो त्वचेचं संरक्षण; कसं? एकदा जाणून घ्याच title=

Poha For Skin: आपल्या सर्वांनाच सकाळी नाश्त्याला कांदेपोहे खायला आवडतात. काही जणांना सकाळी उठल्या उठल्या कांदेपोहे खाण्याची लहर येते आणि मस्त खमखमीत कांदेपोहे नाश्ताला मिळाले की आपला दिवसही चांगला जातो. पण तुम्हाला महितीये का तुम्ही नाश्त्याला खाता त्या पोह्यांपासून सकाळी तुमचे पोटंच नाही तर तुमच्या चेहऱ्यावरची त्वचाही उजळायला मदत होते. (skin benefits poha flaked rice that can instantly grow your skin glow forget any cream)

या पोह्यांपासून तुम्ही चेहऱ्याचा स्क्रबही बनवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला खालील दिलेल्या काही गोष्टींचा समावेश करून घ्यायचा आहे. हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त तांदळाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि पोह्यांचा समावेश करावा लागणार आहे. या स्क्रबचा फायदा तुमच्या त्वचेसाठी तुम्ही करून घेऊ शकता फक्त चेहऱ्यासाठीच नाही तर संपुर्ण शरीरासाठी तुम्ही ही स्क्रब तयार करू शकता. 

पोह्यांपासून स्क्रब कसा तयार करायचा? (How to make the Srub)

एक कप प्रत्येकी तांदूळ, नाचणी, पोहे, चण्याची डाळ यांचे मिश्रण मिस्करमधून काढा. त्यानंतर त्यात गुलाब पाणी टाकून ते मिश्रण मिसळा. ही पेस्ट तुम्ही स्क्रबसाठी वापरू शकता आणि त्याचा वापर करून तो त्वचेला लावू शकता आणि त्यात आवडीनूसार दूध, मध आणि कोरफडीचा गरही घालू शकता. 

काय आहेत या स्क्रबचे फायदे? (What are the Benefits of the scrub)

या स्क्रबमुळे त्वचेवरील मृत पेशांची समस्या दूर होते. त्यातून तेलकट त्वचा निघून जाते. चण्याच्या पिठामध्ये क्लींजिंगचे गुणधर्म असतात, यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास व त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. तांदळामध्ये असणारे स्टार्च मृत पेशींची समस्या दूर करण्याचे कार्य करते. तर नाचणीमधील अमिनो अ‍ॅसिडमुळे त्वचा सैल पडत नाही, तसंच यातील अन्य गुणधर्मामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते. याच कारणामुळे पोह्यांचे स्क्रब आपल्या त्वचेसाठी लाभदायक ठरते. यामध्ये लोहाची मात्रा देखील जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते.