सोफ्यावर झोपताय? सावधान असं झोपणं आरोग्यासाठी ठरतंय धोकादायक

 सोफ्यावर झोपायची तुमची ही सवय सुधारल्यास नक्कीच बरं होईल.

Updated: Apr 4, 2022, 03:59 PM IST
सोफ्यावर झोपताय? सावधान असं झोपणं आरोग्यासाठी ठरतंय धोकादायक title=

मुंबई : असं बऱ्याचदा घडतं ती तुम्ही रात्री उशिरापर्यंत टीव्ही पहात असता, बेडवर जायचा कंटाळा करत सोफ्यावरच झोपून जातो. मात्र जर तुम्ही असं नियमितपणे करत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सोफ्यावर झोपायची तुमची ही सवय सुधारल्यास नक्कीच बरं होईल.

आपल्या सर्वांना माहित आहे की, सोफ्यावर पुरेशी आरामदायक झोप मिळणं किती अवघड आहे. कारण ते झोपण्याच्या हेतूने डिझाइन केलेले नाहीत. कारण सोफ्यावर झोपाताना आपल्या शरीराची ठेवण योग्य रितीने राहत नाही. म्हणूनच यावर जास्त काळ झोपणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं.

सोफा हीट ऑब्जर्ब (शोषत) नाही

सोफा केवळ आपल्या झोपेच्या पोझिशनला मर्यादीत ठेवत नाही तर ते पलंगाच्या गादीप्रमाणे उष्णाताही शोषून घेऊ शकत नाही. कारण पलंगात्या गाज्या या एक आरामदायक झोप प्रदान करण्यासाठी तयार केलेल्या असतात. उष्णता शोषकांच्या उद्देशाने डिझाइन केलेले आहेत. तर सोफ्यावरील गाद्या उष्णता शोषत नाहीत.

चुकीची झोपेची स्थिती

सोफ्यावर झोपायचं म्हटलं तर शरीराला जेवढी जागा लागते तेवढी मिळणं अशक्य आहे. पलंगावर तुम्ही स्वत:च्या स्थितीमध्ये झोपू शकत नाही आणि रात्री अस्वस्थ वाटू शकतं. कारण सोफ्यावर सतत एकाच स्थितीत झोपणं अवघड होतं. म्हणूनच जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा तेव्हा शरीराच्या अवयवांमध्ये वेदना होतात.

कमरेचं दुखणं

वाढत्या वयानुसार किंवा काही दुखापतीमुळे पाठीचं दुखणं उद्भवत नाही तर दीर्घकाळ सोफ्यावर झोपल्याने देखील पाठीचं दुखणं उद्भवू शकतं. सोफ्यावर चुकीच्या स्थितीमध्ये झोपल्याने अनेकदा पाठीच्या दुखण्याची समस्या उद्भवते. हे दुखणं त्वरित जाणवणार नाही. एक ते दोन दिवसांनंतर तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो.