हे शब्द जास्त बोलताय? तुम्ही तणावात आहात!

यूएसच्या एका नव्या अभ्यासानुसार असे काही शब्द आहेत, जे तुम्ही पुन्हा पुन्हा उच्चारता. तेव्हा ते दर्शवतं की, तुम्ही तणावात आहात.

Updated: Nov 10, 2017, 02:24 PM IST
हे शब्द जास्त बोलताय? तुम्ही तणावात आहात! title=

नवी दिल्ली : यूएसच्या एका नव्या अभ्यासानुसार असे काही शब्द आहेत, जे तुम्ही पुन्हा पुन्हा उच्चारता. तेव्हा ते दर्शवतं की, तुम्ही तणावात आहात.

स्पीच एक्सपर्टच्या ग्रुपनुसार, जेव्हा कुणी तणावात असतं तेव्हा त्यांच्या तोंडून ‘रिअली’, ‘सो’, आणि ‘व्हेरी’सारखे शब्द निघतात. रिसर्चमधून हेही समोर आलंय की, अशात लोकं बोलतात सुद्धा कमी. 

प्रॉसिडींग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या शोधात १४३ लोकांच्या स्पीच पॅटर्नचं निरीक्षण करण्यात आलं. सर्वांना एक व्हॉईस रेकॉर्डर घालण्यात आले होते. जो थोड्या-थोड्या वेळाने ऑन होत होता.  

हा रेकॉर्डर त्यांनी दिवस घातला. सायकॉलॉजिस्ट मथायस यांनी रेकॉर्डिंग ऎकूण लिहिले आणि त्याचा अभ्यास केला. त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्या लेखी ते जे बोलत होते त्याचा काहीच अर्थ नव्हता. पण याने हे स्पष्ट होतं की, त्यांच्या मनात काय सुरू होतं’.

त्यानंतर त्यांनी जिनोमिसिस्ट्सच्या टीमसोबत मिळून त्यांची स्ट्रेस लेव्हल चेक केली. त्यातून हे समोर आले की, जे लोक तणावात होते त्यांनी अ‍ॅडव्हर्ब्सचा(क्रिया विशेषण) जास्त वापर केला.

सोबतच अशा लोकांनी ‘त्यांचे’ आणि ‘ते’ सारख्या शब्दांचाही वापर कमी केला होता. याने हे स्पष्ट होतं की, जे लोक तणावात होते ते आजूबाजूच्या लोकांपेक्षा स्वत:वर जास्त फोकस करत होते.