तुमच्या घरात आहेत लहान मुलं..पावसाळ्यात घ्या विशेष काळजी..वाचा बातमी

लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते खूप सेन्सिटिव्ह असते ऋतूबदलांचा त्यांच्या स्किनवर खूप परिणाम होतो..

Updated: Jul 31, 2022, 05:21 PM IST
तुमच्या घरात आहेत लहान मुलं..पावसाळ्यात घ्या विशेष काळजी..वाचा बातमी  title=

BABY CARE  IN MONSOON:  पावसाळा सोबत अनेक आजार घेऊनच येतो.पावसाळ्यात त्वचेसंदर्भात अनेक समस्याना तोंड द्यावं लागत .जर तुमच्या घरात लहान मूल असेल तर ही बातमी तुम्ही पूर्ण वाचाच ..लहान मुलांची स्किन खूप नाजूक असते खूप सेन्सिटिव्ह असते ऋतूबदलांचा त्यांच्या स्किनवर खूप परिणाम होतो..लहान बाळाच्या स्किनची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहुयात जेणेकरून या पावसाळ्यात तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेऊ शकाल 

मुलांना सुती कपडे घाला 

पावसात दमटपणा असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा गरम होतं,अशावेळी मुलांना सुती कपडे घालावे आणि ते कपडे सैल असावेत याची काळजी घ्यावी यांनी बाळाच्या स्किनवर रॅशेस होणार नाहीत 

मुलांना हायड्रेट ठेवा 

मुलांना नारळ पाणी,फळांचे रस,भरपूर प्रमाणात पाणी,लिंबू पाणी देऊन हायड्रेट ठेऊ शकता 

डाइपर शक्यतो टाळा 

गर्मीमध्ये मुलांना शक्यतो डायपर घालणं टाळा.कारण घामामुळे स्किन लालसर होऊन इरिटेशन येऊ शकत त्यामुळे मूलं चिडचिड करू शकतात 

कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ

पावसात जर मूल भिजलं असेल तर कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळा आणि ते पाणी थंड करून त्याने बाळाला अंघोळ घालावी असे केल्याने शरीरावर काही बॅक्टरीया असतील तर निघून जायला मदत होईल