मुंबई : न्यूझीलंड: कोरोनाला रोखण्यासाठी जगात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. कोरोना प्रतिबंध लसीमुळे मृत्यूचा धोका कमी होत असल्याचं काही अभ्यासांमधून समोर आलं आहे. मात्र दुसरीकडे कोरोना प्रतिबंधल लस घेतल्यामुळे एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूझीलंडमध्ये ही घटना घडली असून लसीसंदर्भात पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
न्यूझीलंडमध्ये फायझर लस घेतल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. असा दावा करण्यात येतोय की, लसीच्या साईड इफेक्टमुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत सोमवारी माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, बोर्डने हे मान्य केलं की, महिलेचा जीव मायोकार्डिटिसमुळे झाला आहे. फायझर लस घेतल्यानंतर अशा पद्धतीचे साईड इफेक्ट्स फार कमी जणांना होतात. मायोकार्डिटिसच्या दरम्यान हृदयातील मांसपेशींमध्ये सूज येते. अशा परिस्थितीत रक्ताला हृदयात पंप करण्याची क्षमता कमी होते. परिणामी हृदयाच्या कार्यात बदल होतात आणि रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
न्यूझीलंडमध्ये असं पहिलंच प्रकरण घडलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय की, या महिलेचा मृत्यू मायोकार्डिटिसच्या आजाराने झाला आहे. फायझरची लस घेतल्यानंतरच्या साईड इफेक्टमध्ये हा त्रास दिसून येऊ शकतो.
दरम्यान आरोग्य मंत्रालयाकडून या महिलेचं वय जाहीर करण्यात आलं नाही. मात्र या महिलेच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे