ऐनवेळी कंडोम नव्हता, त्याने फेव्हिक्विकचा वापर केला, तो मृत्यूला घट्ट चिकटला

गुजरातमधून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे.

Updated: Aug 25, 2021, 08:16 PM IST
ऐनवेळी कंडोम नव्हता, त्याने फेव्हिक्विकचा वापर केला, तो मृत्यूला घट्ट चिकटला

मुंबई : गुजरातमधून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये सेक्स दरम्यान विचित्र प्रयोग करताना एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीकडे कंडोम नव्हतं. त्यामुळे त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा पराक्रम केला. परिणामी त्याचं मल्टी ऑर्गन फेल्युअर झालं. आणि यामुळेचा त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

कंडोम नसल्याने केला फेविक्विकचा वापर

पोलिसांनी दिेलेल्या माहिती प्रमाणे, मृत्यू झालेला तरूण 25 वर्षांचा होता. तो त्याच्या जुन्या मंगेतरसोबत हॉटेलमध्ये गेला होता. मृतक आणि त्याची मैत्रीण ड्रग्जच्या व्यसनाधीन होते. त्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु यावेळी त्याच्याकडे कंडोम नव्हता, ज्यामुळे त्या व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावले. 

सीसीटीव्हीच्या तपासावरून पोलिसांना समजलं आहे की, जेव्हा तरूण हॉटेलमध्ये आला तेव्हा त्याच्यासोबत दोन मुली होत्या, एक मुलगी त्याच्यासोबत हॉटेलच्या खोलीत गेली होती आणि दुसरी स्कूटी घेऊन निघून गेली होती.

या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या नोंदीनंतर त्यांनी  तपास सुरू केला आहे. तपास आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे, पोलिसांना समजलं आहे की मृत व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फेविक्विक लावला होता. यानंतर त्याचे अनेक अवयव निकामी झाले आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी, पोलिस व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे प्रकरण आणखी स्पष्ट होईल.