नवी दिल्ली : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
केस पांढरे होत असल्याने अनेकजण त्रस्त झालेले असतात. तरुण वयातच अनेकांची केस पांढरे होण्यास सुरुवात होते. तुम्हालाही अशाच प्रकारची समस्या जाणवत आहे? तर मग काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत.
तुमच्या खाण्यामुळे किंवा लाईफस्टाईलमुळे कदाचित तुम्हाला केस सफेद होण्याची समस्या जाणवत असेल. जर ही समस्या दूर करायची असेल तर तुम्ही घरच्याघरी काही खास टिप्स वापरून ही समस्या दूर करु शकता.
आवळ्याचे तुकडे करुन ते खोबरेल तेलात उकळून घ्या. त्यांचा रंग काळा झाल्यानंतर उकळन थांबवा. त्यानंतर ते तेल केसांवर लावा. यामुळे तुमचे केस काळे होतील.
जर तुमचे केसही सफेद होत आहेत तर खोबरेल तेलात लिंबाचे काही थेंब मिसळा. त्यानंतर त्या तेलाने डोक्याची मालिश करा. असे केल्यास केस काळे होतात आणि केसांवर एक चमकही येते.
अद्रक बारीक करुन त्यामध्ये एक चमचा मध मिसळा. त्यानंतर हे मिश्रण दररोज केसांवर लावा, असे केल्यास केस काळे होतात.
आठवड्यातून दोनवेळा गावठी तूपाने डोक्याची मालिश करा यामुळे केस दाट आणि काळे होतील.
कांद्याचा रस केसांना काळ करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे तुमचे केसही सफेद होत असतील तर कांद्याचा रस करुन तो केसांना लावून ट्राय करा.