अंडी खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी...

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं तुम्ही ऐकलंही असेल आणि म्हणतही असाल. होय, अंड आहेच इतकं आरोग्यदायी की सर्वचजण त्याचा समावेश आपल्या आहारात करतात.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 30, 2017, 10:55 AM IST
अंडी खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... title=

मुंबई : 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं तुम्ही ऐकलंही असेल आणि म्हणतही असाल. होय, अंड आहेच इतकं आरोग्यदायी की सर्वचजण त्याचा समावेश आपल्या आहारात करतात.

अंड खाल्याने आपल्या शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम मिळतात आणि त्यामुळे आपलं शरीर सदृढ राहतं. प्रोटीन्स आपल्या शरीरातील स्नायूंना मजबूत बनवण्यास मदत करतं तर, कॅल्शियममुळे दात आणि हाडं मजबूत होतात. 

काय आहे आनंदाची बातमी?

अंड खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अंड्याच्या दरात होणारी वाढ आता थांबलेली आहे. अंड्यांच्या होलसेल भावात आता घट झाली आहे. अंड्याचा दर होलसेल बाजारात ४५५ रुपये (प्रति शेकडा) दराने विकला जात आहे. तर, अद्यापही काही दुकानदार ४८०-४९० रुपये (प्रति शेकडा) या दराने विकत आहेत.

'हे' आहेत अंड्याचे आश्चर्यकारक फायदे

१) वजन कमी करण्यास आणि वाढविण्यास मदत

अंड आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करतं. अंड खाल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. म्हणजेच तुमचं पोट भरलेलं राहतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, अंड्याचा सफेद भागच खावा. कारण, अंड्याच्या आतील पिवळ्या भागात कॉलेस्‍ट्रोलचं प्रमाण प्रचंड असतं. ज्या मुलांचं वजन कमी असतं त्यांना दररोज अंड खाण्याचा सल्ला दिला जातो.

२) डोळ्यांसाठी आवश्यक 

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटिनाइड्स असतं. हे डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आणि लाभदायक असतं. दररोज एक अंड खाल्ल्यास मोतीबिंदूची समस्या जाणवत नाही.

३) स्मरणशक्ती वाढवण्यास मदत

अंड्यामध्ये असलेले ओमेगा ३, विटॅमिन आणि फॅटी अॅसिड शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. इतकचं नाही तर अंड्यात कोलीन असतं त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते आणि तुम्ही अॅक्टीव्ह राहता. यासोबतच अंड्यात असलेले B-१२ हे जीवनसत्व तंदुरुस्त ठेवतात.

४) केस आणि त्वचेसाठी गुणकारी

अंड्याच्या आतमधील पिवळा भाग हा केसांसाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतो. त्यामुळे केस कोमल आणि मुलायम होतात. 

५) मिळते भरपूर एनर्जी

अंड खाल्याने शरीराला भरपूर एनर्जी मिळते. नाश्त्यामध्ये अंड खाल्यास तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जी मिळते आणि तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x