उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं; या गोष्टींची घ्या काळजी

Tips To Beat summer Heat: उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घेतली तर नक्कीच फायदा होईल. यासाठी अधिकाधिक पाणी प्यावे, तसेच फळांचा रस घेणे आवश्यक ठरते.

Updated: Apr 17, 2022, 04:00 PM IST
उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं; या गोष्टींची घ्या काळजी title=

मुंबई  :  उत्तर भारत, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. घरातून बाहेर पडताच कडक उन्हात आपल्याला घाम फुटतो. तीव्र उष्णतेमुळे आपण आजारी देखील पडू शकतो. मात्र, काळजी घेतल्यास तुम्ही उन्हापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. उन्हाळ्यात तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता ते पाहूया...

उष्णतेपासून डोकं आणि कान सुरक्षित ठेवा

घराबाहेर पडताना कान आणि डोक्याचे तीव्र उन्हापासून संरक्षण करायला हवे. उष्णतेमुळे तुमचा चेहरा काळा पडू शकतो आणि टॅनिंग होऊ शकते. कानात गरम हवा जाऊ नये म्हणून कान बांधून ठेवा. दुसरीकडे ऊन थेट डोक्यावर पडल्याने डिहायड्रेशनची होऊ शकते.

भरपूर पाणी पिणे

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून वेळोवेळी पाणी पीत रहा.

सुती आणि आरामदायक कपडे घाला

उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत. जास्त जड कपडे परिधान केल्यास तुम्हाला खूप उष्णता जाणवेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.

उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा

तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा सनस्क्रीन लोशन लावावे, जेणेकरून तुमची त्वचा कडक सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहील. यामुळे तुमची त्वचा काळी पडणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही.

फळांचा रस पीत रहा

फळांचा रस अधिक प्या. ज्यूस प्यायल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात. यामुळे तुमचे शरीर ताजेतवाने राहते. जर तुम्ही उन्हाळ्यात फळांचा रस घेत राहिलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण काही फळे थंड असतात, ज्यामुळे तुमचे शरीर थंड राहते.