सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?

Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Updated: Mar 10, 2023, 11:04 AM IST
सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला? title=

Wear masks in crowded place : कोरोनानंतर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नसाल तर सावधान. (H3N2 is a type of influenza virus)कारण गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यास किंवा मास्क काढल्यास तुम्हाला इन्फ्लुएन्झाचा धोका आहे. (Wear masks in crowded places) फ्लूच्या रुग्णांमध्ये (fever patient) अचानक पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. (H3N2 influenza hits India)

देशात इन्फ्लूएंझा ए उपप्रकार H3N2 प्रकरणांचा (H3N2 cases ) अचानक उद्रेक झाला आहे. देशभरातील रुग्णालये गेल्या काही महिन्यांपासून इन्फ्लूएंझा A उपप्रकार H3N2 ची लक्षणे नोंदविण्यात आली आहेत. यामुळे 3-5 दिवस ताप येतो आणि सतत खोकला येतो. जो तीन आठवड्यांपर्यंत टिकतो. त्यामुळे  सरकारने आपल्या सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दवाखान्यांत तापाचा तसेच या विषाणूचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचा आणि औषधांचा पुरवठा आणि कफ सिरप सांभाळण्याचा सल्ला दिला आहे.

H3N2 इन्फ्लूएंझाच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शक तत्त्वे आणि खबरदारी घेण्याबाबत सूचवत आहेत.  H3N2 हा इन्फ्लूएन्झा व्हायरसचा एक प्रकार आहे, जो आपण दरवर्षी या काळात पाहतो. परंतु हा एक विषाणू आहे जो कालांतराने बदलतो त्याला अँटिजेनिक ड्रिफ्ट म्हणतात. आपल्याला अनेक वर्षांपूर्वी H1N1 मुळे साथीचा रोग झाला होता. त्या विषाणूचा प्रसारित होणारा ताण आता H3N2 आहे आणि म्हणूनच तो सामान्य इन्फ्लूएंझा स्ट्रेन आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

H3N2 Virus : ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

ICMRने H3N2 पासून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, लोकांना नियमित हात धुण्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तापची  लक्षणे जाणवत असल्यास मास्क घालणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जावू नका. खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवणे, डोळे आणि नाकाला स्पर्श न करणे असे सल्ले देण्यात आले आहेत. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधोचार करावा.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनाही अशा रुग्णांवर उपचार करताना फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत. तशा सूचना करण्यात आल्या आहेत. उपाचारादरम्यान प्रतिजैविकांचा वापर करु नये, असे आयसीएमआरने सांगितले आहे.