उन्हाळ्याच्या दिवसात वापरा हे खास फेसपॅक

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट, चिपचिपित होण्यासाठी अनेक कारणं असतात.

Updated: May 10, 2019, 06:32 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसात वापरा हे खास फेसपॅक title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात सूर्याच्या तिव्र किरणांचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट, चिपचिपित होण्यासाठी अनेक कारणं असतात. तीव्र ऊन, घाम, सोबत प्रदुषण, धूर, धूळ यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येण्याचे प्रमाण वाढते. सोबतच अ‍ॅक्नेचा त्रासही बळावतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुली अनेक प्रकारच्या प्रोडक्टचा वापर आपल्या चेहऱ्यावर करतात. पण या प्रोडक्टमध्ये अनेक प्रकारचे रसायने असतात. सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरात फेस पॅक तयार करून तो पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता. 
 
काकडीपासून तयार करू शकता फेसपॅक
काकडीच्या सालींवर साखर लावा. १५ ते २० मिनटे ते फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर ते संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि २० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्यात चेहरा धुवा.

दही आणि कोरफडचं फेसपॅक
दही आणि कोरफडचं फेसपॅक तयार करताना ४ चमचे कोरफडचं गर आणि १ चमचा दही एकत्रित करून घ्या. हे मिश्रण २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्यात चेहरा धुवा.  

टोमॅटो आणि मध
टोमॅटोच्या रसा मध्ये १ चमचा मध मिसळा आणि २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. अठवड्यातून दोन-तीन वेळा हे फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होईल.