Vitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या

Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.

Updated: Dec 13, 2022, 10:25 PM IST
Vitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या title=

Symptoms of Vitamin-C Deficiency: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आवश्यक असतात. (Health News in Marathi) दुसरीकडे, जर आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर आपल्या शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जसे वय होत जाते तसे आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवत असते. बरेच लोक व्हिटॅमिन सीची कमतरता फार हलके घेतात. पण व्हिटॅमिन सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे या समस्या  

वारंवार आजारी पडणे-

व्हिटॅमिन सी शरीराला रोगांशी लढण्याची ताकद देते. ते तुमची त्वचा, रक्तवाहिन्या, हाडे आणि कार्टिलेज मजबूत ठेवते. तुम्हाला दुखापत झाल्यास ते लवकर बरे होण्यास मदत होते. जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा अनेकदा आपले लक्ष फक्त रोगाकडे असते. पण जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा आजारी पडत असाल, तर तुम्ही व्हिटॅमिन टेस्ट करून घेतली पाहिजे.

व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर करण्यासाठी ही फळे खा 

शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर सप्लिमेंट्सऐवजी मल्टीविटामिन घेणे केव्हाही चांगले. याशिवाय तुम्ही आहारात संत्री, लिंबू, हंगामी फळे घेऊ शकता.याशिवाय बेरी, ब्रोकोली, पेरु इत्यादींचाही आहारात समावेश करु शकता. 

मूडशी संबंधित समस्या 

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला डिप्रेशनचेही बळी पडू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही व्हिटॅमिन सीच्या कमतरतेकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला अॅनिमिया देखील होऊ शकतो. दुसरीकडे, जर तुमचे केस कोरडे होत असतील तर त्यामागील कारण व्हिटॅमिन सीची कमतरता देखील असू शकते. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)