Importance of Vitamin D during Pregnancy For Baby : प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आई होणे हा असतो. गर्भधारणेनंतर प्रत्येक स्त्रीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणाचा काळ जितका आनंददायी आहे तितकाच तो आव्हानात्मकही आहे. गर्भधारणेनंतर महिलेला शक्य तितके खाण्यास सांगितले जाते. पण शक्य तितका संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणेदरम्यान अनेक आवश्यक पोषक घटकांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे व्हिटॅमिन डी, जे आई आणि गर्भ या दोन्हींचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
याचदरम्यान एका संशोधनातून निदर्शानात आले की, गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे निदान झालेल्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या बाळांला नंतरच्या आयुष्यात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) होण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसून आले आहे. ऑटिझम म्हणजेच मेंदूतील फरकांमुळे होणारे विकासात्मक अपंगत्व आहे. काही लोकांना याचा त्रास होत असून त्याची कारणे अनुवांशिक परिस्थिती मानली जातात. पण इतर कारणांबद्दल माहिती नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या समस्येची अनेक कारणे असू शकतात. संशोधनानुसार, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर लगेचच किंवा अनुवांशिकदृष्ट्या प्रवृत्ती असलेल्या मुलांमध्ये ऑटिझमचा धोका वाढू शकतो. गरोदरपणात मुलांमध्ये ऑटिझमची समस्या कशी उद्भवू शकते आणि ती कशी टाळता येईल हे जाणून घेऊया.
क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे संशोधक प्रोफेसर जॉन मॅकग्रा यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले की, व्हिटॅमिन डीचे पूरक डोस ऑटिझमचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. क्वीन्सलँड ब्रेन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी चार हजारांहून अधिक गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर हा निकाल समोर आला आहे. त्यांना असे आढळून आले की ज्या महिलांच्या गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होते त्यांना वयाच्या सहाव्या वर्षी ऑटिझमचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर गर्भवती महिलेला व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तिच्या गर्भात न्यूरोलॉजिकल विकासाशी संबंधित विकार होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान फक्त फोलेट सप्लिमेंट्स घेतल्याने बाळाला जन्मजात पाठीचा कणा दोष (स्पाइना बिफिडा) होण्याची शक्यता कमी होते, असे अभ्यासात म्हटले आहे.
स्पिना बिफिडामध्ये, पाठीचा कणा आणि त्याचे आवरण यांच्यामध्ये एक अंतर तयार होते. यामुळे शरीराच्या खालच्या भागात अर्धांगवायू होऊ शकतो आणि कधीकधी मेंदूला अपंगत्व देखील येऊ शकते. यासाठी गरोदर महिलांना व्हिटॅमिन डीचा पूरक डोस देऊन मुलांना ऑटिझमपासून वाचवता येते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.