थंडीमुळे नाही तर 'या' 3 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाचांना पडतात भेगा

Cracked Heels Cause : थंडीमध्ये शरीरावर, खास करुन त्वचेवर मोठा बदल होताना दिसतो. या दिवसांमध्येच पायाला भेगा पडतात. पण या भेगा थंडीमुळे नाही तर शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जाणवतात.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 21, 2024, 04:39 PM IST
थंडीमुळे नाही तर 'या' 3 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाचांना पडतात भेगा  title=

पायांना भेगा पडल्यामुळे सौंदर्य कमी होत असं अनेकांना वाटतं. थंडीत हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे हाता-पायांना भेगा पडतात, असं अनेकांना वाटतं. अनेकदा अस्वच्छता, चुकीचं स्किन केअर रुटीन, कोरडेपणा आणि हार्मोन्समधील बदलांमुळे पायाच्या भेगांमध्ये भेगा पडतात.  पण फक्त थंड वातावरणच याला जबाबदार नाही तर शरीरातील व्हिटॅमिनची कमतरतेमुळे देखील असं होतं. 

मुख्य कारण 

त्वचा जेव्हा सुखू लागते त्यामधील आर्द्रता कमी होते. यामुळे पायांमधील भेगा अधिक रुक्ष आणि कडक होतात. फिशर प्रमाणे खोलवर भेगा पडतात. तसेच हा त्रास अगदी त्वचेला भेगा पाडून त्यामध्ये जखम देखील होते. याचं मुख्य कारण आहे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता. 

कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता?

ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीची कमतरता असते त्यांना टाच फुटण्याची समस्या जास्त असते. शरीरात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे, त्वचेला तडे पडतात आणि त्वचेला तडे दिसू लागतात. व्हिटॅमिन ई आणि सी कोलेजन वाढवण्यास मदत करतात. ही दोन्ही जीवनसत्त्वे त्वचेची काळजी घेतात. खनिजे, झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळेही त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो.

होर्मोन्सचे असंतुलन 

शरीरात हार्मोन्सचे असंतुलन असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरही होतो. ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे किंवा इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्सचा त्रास होतो, त्यांच्या टाचांनाही तडा जाऊ लागतो. काहीवेळा जेव्हा समस्या गंभीर बनते तेव्हा टाचांमध्ये भेगा पडतात आणि रक्तस्त्राव सुरू होतो.

भेगा पडलेल्या टाचांवर उपाय 

घाणीमुळे टाचांना भेगा पडल्या असतील तर ते घासून स्वच्छ करता येतात. घाण काढून टाकल्यानंतर, टाच बरे होतील.
भेगा पडलेल्या टाचांना स्वच्छ करण्यासाठी हील बामचा वापर केला जाऊ शकतो. हे त्वचेला मॉइश्चरायझ करेल.
कोमट पाण्यात 20 मिनिटे पाय भिजवा, आता टाच प्युमिस स्टोनने स्वच्छ करा.
तुमच्या आहारात झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा, यामुळे त्वचा निरोगी राहते आणि तिची देखभाल करण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ई त्वचेला बरे करते, यासाठी आहारात नट आणि बियांचा समावेश करा.
कोरडेपणा कमी करण्यासाठी, आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x