रताळे खूप पौष्टिक आणि चवीलादेखील छान लागते. यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरसारखे गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रताळ्याच्या सेवनाने शरीराला अनेक लाभ होतात. रताळ्यामुळं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि पाचन सुधारते. तसंच, त्वचेलादेखील फायदेशीर आहे. मात्र, अतिप्रमाणात रताळं खाल्ल्याने काही लोकाना आरोग्याच्या तक्रारीही जाणवू शकतात. त्यामुळं कोणी रताळं खावू नये हे जाणून घ्या.
रताळ्यात कार्बोहायड्रेटची मात्रा अधिक असते. ज्यामुळं ब्लड शुगर लेव्हल वाढते. रताळ्यात ग्लायसेमिक इंडेक्स बटाट्यापेक्षा कमी असते. मात्र तरीही मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणातच रताळ्याचे सेवन करावे.
रताळ्यात ऑक्सलेटची मात्र अधिक असते. ज्यात किडणी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं किडणीचा आजार असलेल्या लोकांनी रताळं खाणं टाळलं पाहिजे. कारण यात किडनी पोटेशियम व्यवस्थित कार्य करत नाही.
पाचनसंस्था कमजोर असेलेले लोक
रताळ्यात फायबरची मात्रा अधिक असते. जे पाचनसंस्था निरोगी ठेवते. एखाद्याला गॅस, अॅसिडिटी, सूज, अपचन सारख्या समस्या असतील तर रताळ्याचे अधिक सेवन करणे टाळावे. अन्यथा त्याचा त्रास अधिक वाढू शकतात.
लठ्ठपणा
रताळ्यात पोषक तत्व भरपूर असते. मात्र यात कॅलरी अधिक असते. तुम्ही वजन कमी करण्यासाठी रताळं खात असाल तर त्यामुळं तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर रताळं जास्त प्रमाणात खावू नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)